‘बिग बॉस १७ हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून या शोचा आता अंतिम प्रवास सुरु झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आता फक्त ९ स्पर्धक राहीले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांना एक खास भेट दिली आहे. हा शोच्या अंतिम भाग होण्यापूर्वी, ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी ओळख करुन देणार आहे. त्यामुळे येत्या ‘फॅमिली स्पेशल’ वीकमध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. कलर्सच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडल्सद्वारे एक नवीन व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावेळी अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी त्याचबरोबर भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले. (Bigg Boss 17 New Promo)
यावेळी अंकिताची आई आपल्या लेकीला व विकीला समजावताना दिसते. यावेळी ती दोघांना सूचना देत असे म्हणते की, “तुम्ही जसे आहात, तसे या शोमध्ये दिसत नाही आहात. तुमच्यातील वाद आता वाढत आहेत. मला गेले काही दिवस तुमच्या वादामुळे झोप येत नाही आहे. जग तुमच्या नात्याची चेष्टा करत आहे. त्यामुळे तुम्ही जरा समजून उमजून वागा, बोलताना भान ठेवा. घराबाहेर तुमचे अनेक चाहते आहेत, त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट बोलल्यानंतर त्यांना तुम्ही हे असं काय बोलून गेलात असं वाटलं नाही पाहिजे.”
आणखी वाचा – “मुंबई सगळ्यात वाईट शहर कारण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली, “बँडस्टँड, हाजीअलीसारखी ठिकाणं…”
यापुढे अंकिताची आई दोघांना त्यांच्या खेळावरुन काही सूचना देते. यावेळी ती असे म्हणते की, “विकी त्याचा त्याचा खेळ खेळत आहे, त्याला खेळुदेत, मग अंकिता तु तुझा खेळ खेळण्याचा प्रयत्न कर. तुम्ही दोघांनी समंजसपणे खेळा. तुम्ही दोघे एकमेकांचे स्पर्धक आहात, शत्रू नाही. या घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला पुढे एकत्र आयुष्य जगायचे आहे.” त्याचबरोबर अंकिताची आई असे म्हणते की, “घराबाहेर खुप साऱ्या गोष्टी घडत आहेत.” यावर अंकिता चिडून असे म्हणते की, “काय होत आहे घराबाहेर? आम्ही नॉर्मल तर वागत आहोत.”
आणखी वाचा – Bigg Boss 17 : नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या “तुम्ही तुमच्या नवऱ्याला…”
यावर पुन्हा विकी अंकिताची समजूत काढत असे म्हणतो की, “तुझी आई काय म्हणत आहे तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला आयुष्यात कधी सुधारायचे नाही आहे का? त्या जे काय बोलत आहेत, त्यावर आपण दोघांनी विचार करुन निर्णय घेऊ”. दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स् व कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओखाली अंकिताच्या आईचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर काहींनी अंकिता दुटप्पीपाने वागत असल्याचेही म्हटले आहे.