शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१७६ रुम, पाहुणेमंडळी अन्…; उदयपूरमध्ये पुन्हा एकदा होणार आमिर खानच्या लेकीचं लग्न, शाही विवाहसोहळ्याची तयारी सुरु

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 12:42 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor aamir khans daughter ira and nupur shikhare royal wedding in udaipur

१७६ रुम, पाहुणेमंडळी अन्…; उदयपूरमध्ये पुन्हा एकदा होणार आमिर खानच्या लेकीचं लग्न, शाही विवाहसोहळ्याची तयारी सुरु

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नुकतीच (३ जानेवारी) रोजी तिचा बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकली. साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला असून घरच्या काही मोजक्या कुटुंबियांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. आयरा आणि नूपुरने नोंदणी पद्धतीने लग्न केले असून येत्या ८ जानेवारीला उदयपूर येथे शाही पद्धतीने त्यांचा पुन्हा एकदा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर १३ जानेवारीला मुंबई मधील जिओ वर्ल्ड येथे त्यांच्या लग्नाचा भव्य रिसेप्शन सोहळाही पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. (Ira Khan And Nupur Shikhare Wedding)

आयरा-नुपूर येत्या ८ जानेवारीला उदयपूरच्या ताज आरवली हॉटेलमध्ये शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. आयराच्या शाही लग्नासाठी आमिरने हॉटेल ताज अरावलीमध्ये १७६ खोल्या बुक केल्या आहेत. तसेच या लग्नाला जवळपास २५० पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या लग्नासाठी अनेक बड्या कलाकारांची हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ७ जानेवारीपासूनच पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यांच्या लग्नाचा हा थाट १० तारखेपर्यंत चालणार आहे. लेकीच्या लग्नाची सर्व तयारी व व्यवस्था करण्यासाठी आमिर ५ जानेवारीला उदयपूरसाठी रवाना होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – “देवबाप्पा जेवण बनवत आहे कारण…”, धुकं पाहून क्रांती रेडकरची लेक काय म्हणाली ऐका, अभिनेत्री म्हणते, “माझ्या भाच्याचं निधन…”

नूपुरने त्याच्या लग्नात तब्बल ७ किलोमीटर धावत जात हजेरी लावली. स्वत:च्या लग्नात नूपुरने शॉर्ट पॅंट व बनियनमध्ये हजेरी लावली होती. तर आयरानेही आयरा खानने लग्नात धोती चोली असा हटके ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने या ड्रेसवर कोल्हापुरी चप्पल घातली होती. दोघांचा साधा लूक पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. तर काहींनी त्यांच्या साधेपणाचं कौतुकही केलं. आमिर मात्र लेकीच्या लग्नात खास लूक केला होता. आमिर लेकीच्या लग्नात कुर्ता धोतर व त्यावर मराठमोळ्या फेट्यामध्ये पाहायला मिळाला.

आणखी वाचा – “तू जास्तचं भोगलं आहेस अन्…”, केदार शिंदेंची बायकोसाठी भावुक पोस्ट, “माझ्या आयुष्यात येणं ही…”

दरम्यान, आयरा-नूपुर यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी काही आहेर न आणण्याचा नियम करण्यात आला आहे. आयरा-नुपूरच्या यांच्या या नियमामागे एक सुंदर विचार आहे. तो म्हणजे भेटवस्तूंऐवजी पाहुण्यांनी त्यांच्या संस्थेला देणगी देण्याची विनंती केली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, आयराने लग्नात भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला असून पाहुण्यांना भेटवस्तूंऐवजी आशीर्वाद व आगत्सू फाउंडेशनला देणगी द्यावी असे म्हटले आहे.

Tags: aamir khanbollywood newsentertainment newsira khanIra khan and nupur Shikhare Weddingira khan weddingIra Khan-Nupur Shikhare Marriage Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
actress suruchi adarkar spoken about her husband's reaction about new role in satvya mulichi satavi mulgi

“भूमिकेविषयी कळताच पियुष…”, लग्नानंतर मालिकेत काम करताना सुरुचीच्या नवऱ्याची प्रतिक्रिया काय होती?, म्हणाली, “आमच्यामध्ये…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.