शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंसा आणि लैंगिकता…”, वैभव मांगलेंची रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर टीका, म्हणाले, “खूप घातक…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 26, 2023 | 2:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor vaibhav mangle shared post about animal movies violence and negativity

"हिंसा आणि लैंगिकता…", वैभव मांगलेंची रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटावर टीका, म्हणाले, "खूप घातक…"

मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे वैभव मांगले. ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारखी अनेक नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’सारख्या मालिका  व ‘काकस्पर्श’, टाईमपास’, ‘शाळा’, ‘कुटुंब’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या विविधांगी भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Vaibhav Mangle On Animal)

वैभव हे अभिनयातच नाही, तर गायन, सूत्रसंचालन व विनोदी कलाकार म्हणूनही चांगलेच प्रसिद्ध आहेत. वैभव मांगले हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपले अनेक फोटो, व्हिडीओज व कामासंबंधीची माहितीही शेअर करतात. त्याचबरोबर ते समाजातील विविध मुद्द्यांवरही परखडपणे भाष्य करताना दिसतात. अशातच त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  

आणखी वाचा – दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकाणार?

सध्या देशभर ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. तरुणवर्गांसह अनेकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आहे. अशातच वैभव मांगले यांनी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटावरुन फेसबुकवर एक पोस्ट शेयर केली आहे आणि या पोस्टद्वारे त्यांनी एक प्रश्नही उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “‘अ‍ॅनिमल’ आणि ‘अल्फा मेल’ या दोन गोष्टींआडून अनेक गोष्टींचे समर्थन दिग्दर्शकाने केले आहे जे खूप घातक आहे. (उदा. हिंसा आणि लैंगिकता) असे वाटते का?” दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयने ५७व्या वर्षी पत्नीबरोबर केलं दुसऱ्यांदा लग्न, हिंदू पद्धतीने पार पडला विवाहसोहळ, लिपलॉक केलं अन्…

या पोस्टवर अनेकांनी “हो नक्कीच घातक आहे. खास करून नुकत्याच तारुण्यावस्थेत पदार्पण केलेल्या मुला-मुलींसाठी असे चित्रपट घातक आहेत, होय १००%, हे भावी पिढीसाठी खुप घातक आहे, आजकाल नको त्या गोष्टी मुद्दाम सामान्य मानण्याचा केलेला प्रयत्न दिसून येतो, अगदी बरोबर, नवीन पिढी अधोगतीकडे चालली आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टखाली कमेंट्सद्वारे काहींनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर काहींनी निषेधार्थ आपलं मत व्यक्त केलं आहे.  

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi newsvaibhav mangalevaibhav mangle
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding

लग्नाला एक महिना पूर्ण होताच प्रसाद जवादे-अमृता देशमुखची लग्नपत्रिका व्हायरल, पाहा काय आहे यामध्ये खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.