सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच कलाविश्वातही लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अमृता देशमुख-प्रसाद जवादे, सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या जोड्या शाही थाटामाटात विवाहबंधनात अडकल्या. यांनतर आता लवकरच गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर व स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या जोड्या लगीनगाठ बांधणार आहेत. या कलाकारांच्या पाठोपाठ आता आणखी एक मराठमोळी कलाकार लग्नबंधनात अडकणार आहे. (Sonal Pawar Wedding)
छोट्या पडद्यवरील आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीही लग्नबंधनात अडकणार आहे. ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारच्या घरीही लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री सोनल पवारच्या मेहंदी सोहळ्यातील बरेच फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी खास तयार झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मेहंदी सोहळ्यातील तिच्या खास लूकनेही लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच अभिनेत्रींच्या नक्षीदार मेहंदीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अभिनेत्री सोनल पवार समीर पालुष्टेसह लग्नबंधनात अडकणार आहे. समीरच्या घरीही हळदीची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अत्यंत पारंपरिक अंदाजात हळदीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लग्नाची हळद फोडणे हा कार्यक्रम नवऱ्यामुलाच्या घरी सुरु आहे. सोनल व समीरच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनल व समीर यांचा थाटामाटात साखरपुडा सोहळा संपन्न झाला.
आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण
सोनलचा नवरा समीर हा बिझनेसमन असून स्पार्कल्स मीडिया या कंपनीचा तो फाऊंडर तसेच सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो. समीरला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार ही मिळाला आहे. समीर-सोनल यांच्या साखरपुड्यानंतर चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या साखरपुड्याच्या रोमँटिक व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवत लाईक्सचा वर्षाव केला आहे. त्यानंतर आता त्यांच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.