रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडमध्येही लगीनघाई! अरबाज खान दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात, पत्नीसह शेअर केलेल्या फोटोंनी वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 25, 2023 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor arbaaz khan married with makeup artist shur khan photo viral on social media

बॉलिवूडमध्येही लगीनघाई! अरबाज खान दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात, पत्नीसह शेअर केलेल्या फोटोंनी वेधलं लक्ष

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. गेले काही दिवस त्याच्या नवीन लग्नाबाबतच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगटणा पाहायला मिळत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. अरबाजने नुकतंच मेकअप आर्टिस्ट शूरा खानबरोबर लग्न केले आहे. रविवार, २४ डिसेंबर रोजी अर्पिता खानच्या घरी या दोघांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर जवळपास ६ वर्षांनी अरबाजने शुरा खानबरोबर त्याचा दूसरा संसार थाटला आहे. (Arbaaz Khan On Instagram)

अरबाज व शुरा खान यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. तसेच या लग्नसोहळ्याला त्याचे जवळचे कुटुंबीय व मोजकांच मित्रपरिवार उपस्थित होता. अरबाज-शुरा यांचा हा विवाहसोहळा पार पडताच अरबाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अरबाज व शूरा यांचा हा फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळींनी लाईक्स व कमेंट्स करत तुफान प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण

अरबाजने लग्नात खास पोशाख परिधान केला होता. त्याने फुलांच्या डिझाईन असलेला शर्ट व त्यावर सोनेरी रंगाची पॅंट परिधान केली होती तर, शुरानेही अरबाजच्या कपड्यांना साजेसा असा पेस्टल रंगाचा गुलाबी लेहेंगा व त्यावर सोनरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. त्याचबरोबर डोक्यावर मॅचिंग स्कार्फही घेतला होता. तसेच या फोटोंमध्ये तिने तिच्या कपड्यांना साजेसा मेकअप व दगिन्यांचा साजशृंगारही केल्याचे दिसून आले.

आणखी वाचा – अरबाजच्या खानच्या ‘त्या’ कृतीने दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम, अभिनेत्यानेच केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

अरबाजने त्याची दुसरी पत्नी शूरा खानबरोबरच्या लग्नातील फोटो शेअर केले असून या फोटोखाली त्याने असे म्हटले आहे की, “आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, मी व माझी मैत्रीण आजपासून कायमचे एकत्र झालो आहोत. या खास दिवशी मिळालेल्या तुमच्या प्रेम व आशीर्वादासाठी धन्यवाद.” दरम्यान, या फोटोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे या नवदाम्पत्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.

Tags: arbaaz khanarbaaz khan weddingbollywood newsentertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage Marathi News

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : आली लग्नघटिका समीप! गौतमी-स्वानंदच्या लग्नाचा मंडप सजला, पुण्यातील 'या' रिसॉर्टमध्ये पार पडणार शाही लग्नसोहळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.