शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 15, 2023 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor shreyas talpade gets heart attack undergoes angioplasty see his health updates

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?

बॉलिवूडसह मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. नुकतीच त्याच्या तब्येतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटांचं चित्रीकरण करत होता. ते संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. चित्रीकरणानंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेच अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

श्रेयस हा दिवसभर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकदम व्यवस्थित होता. चित्रीकरण करताना तो सर्वांशी मज्जा-मस्ती व विनोददेखील करत होता. तसेच त्याने थोडेसे अ‍ॅक्शन असलेले सीक्वेन्सही शूट केले. मात्र घरी येताच त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि ही गोष्ट त्याने त्याच्या पत्नीला सांगितली. यावर ती त्याला लगेच रुग्णालयात घेऊन गेली. त्याच्या तब्येतीबाबत रुग्णालयाने असे म्हटले आहे की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

आणखी वाचा – Video : कोकणात स्वतःच्या गावी पोहोचली पूजा सावतं, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझं घर…”

अशातच श्रेयसची तब्येत आता बरी असून त्याच्यावरील मोठा धोका टळला आहे. त्याच्या तब्येतीत आता लवकर सुधारणा होत असल्याचेही कळत आहे. तरीही त्याला विश्रांतीसाठी आणखी दोन दिवस रुग्णालयात ठेवणार असल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, त्याच्या तब्येतीची बातमी कळताच चाहत्यांना धक्का बसला. त्यामुळे श्रेयसच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तो बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – “संवेदनशील, नीडर, रोखठोक…” उत्कर्ष शिंदेची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला, “माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी…”

दरम्यान, झी मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस घराघरात पोहोचला. तसेच त्याच्या आगामी ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटात श्रेयससह अक्षय कुमार रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा व कृष्णा अभिषेक आदी कालाकार आहेत.

Tags: bollywood actorentertainmententertainment newsmarathi actorMarathi newsshreyas talpadeshreyas talpade news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shreyas Talpade Health Update

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी नेमकं काय घडलं?, घरी येऊन लगेचच पत्नीला सांगितली ती गोष्ट अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.