मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. हा कार्यक्रम मागील बरीच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकलं. या कलाकारांपैकी एक म्हणजे सगळ्यांची आवडती अभिनेत्री कल्याणची चुलबुली शिवाली परब. शिवालीचा अभिनयातील विनोदीपणा व नटखटपणा तर सगळ्यांनाच आवडतो. शिवालीचा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या बहिणीच्या हळदीतील एक हटके व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यात ती भन्नाट डान्स करताना दिसते. तर तिच्या बाबांचा एक वेगळाच अंदाज सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.(Shivali parab dance video with her father)
नुकतीच शिवालीच्या घरी तिच्या बहिणीची हळदी समारंभ पार पडला. महाराष्ट्रातील लग्न सोहळा म्हणजे मोठा उत्साह पाहायला मिळतो. हळदीचा सोहळा म्हणजे चांगलीच धुमशान असते. तशीच धुमशान शिवालीच्या घरीही पाहायला मिळाली. शिवालीने हळदीतील डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात सुरुवातीला शिवाली व तिची बहीण दणक्यात नाचताना दिसते. यावेळी शिवाली व तिच्या बहिणीचा बेधडक अंदाज पाहायला मिळला. पण त्यानंतरचा शिवालीच्या बाबांचा भन्नाट अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शिट्या वाजवत, भन्नाट स्टेप्स करत त्यांनी हळदीच्या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. कलाकारांसह नेटकऱ्यांनीही बरेच लाईक, कमेंट करत तिच्या बाबांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव कमेंट करत म्हणाली, ‘बाबा ऑन फायर’. असं लिहीलं आहे. अभिनेता समीर चौघुले यांनी ‘बाबा रॉक्स’, अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने लिहीलं की ‘बाबा म्हणजे एकदम जबरदस्त. लय भारी’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘बाबांनी मिथून दादांसारखा डान्स केला’, असं लिहिलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘मी तुझ्या बाबांचा डान्स पुन्हा पुन्हा पाहत आहे. मी त्यांचा फॅन झालो आहे. माझ्याकडून त्यांना खूप सारं प्रेम’, असं लिहीत तिच्या बाबांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात शिवालीची बरीच पात्र गाजली. तिने साकारलेलं मोना डार्लिंग, शिवाली अवली कोहली यांसारख्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. शिवाली तिच्या भूमिकांमुळे तर चर्चेत असते. तसंच तिचे फोटोशूटही बरेच चर्चेत असतात. तिचा हटके अंदाज नेटकऱ्यांनाही बराच आवडताना दिसतो.