Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वादविवाद पाहणंही रंजक ठरतंय. सध्या प्रत्येक स्पर्धक उत्तम खेळी खेळताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा समीकरणे बदलत असताना पाहायला मिळतात. ‘बिग बॉस’च्या घरात कधी मैत्री तर कधी शत्रुत्व पाहायला मिळते. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला स्पर्धकांमध्ये मैत्री पाहायला मिळाली मात्र कालांतराने जसजसा खेळ सुरु झाला तशी त्यांच्यातील मैत्री कमी होत गेली.
अशातच ‘बिग बॉस १७’च्या सुरुवातीला दोन स्पर्धकांमध्ये चांगलंच बॉण्डिंग पाहायला मिळालं. यानंतर आता या दोन स्पर्धकांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हे दोन स्पर्धक म्हणजे अभिषेक कुमार व विकी जैन. या दोन स्पर्धकांमध्ये चांगलीच बॉन्डिंग पाहायला मिळाली. मात्र आता त्यांच्या मैत्रीत दरार आली असल्याचं पाहायला मिळतंय. अभिषेक व विकीमध्ये भांडण जोरदार भांडण झाले आहे.
‘बिग बॉस’ने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अभिषेक व बाबू भैया भांडी धुताना दिसत आहेत. अभिषेक विकीला फोन करतो आणि भांडी ठेवायला सांगतो. तर विकी म्हणतो, “मी का काम करू? ते तुमचे काम आहे”. तर यावर अभिषेक म्हणतो की, “मग ड्युटी बदलण्यात येईल. माझ्या वाटेला जास्त काम येत आहे”. यानंतर विकी व अभिषेक यांच्यात वाद सुरु होतो.
अभिषेक विकीला सांगतो की, “तू माझ्याशी भांडू नकोस. वयाच्या चाळीशीत या सर्व गोष्टी करू नकोस. नालायक व्यक्ती” असा अपशब्द वापरत तो त्याला बोल लगावतो. यादरम्यान अंकिता या भांडणामध्ये पडते. तेव्हा ती अभिषेकला पुन्हा पुन्हा वयावरून बोलू नकोस असे सांगते. मात्र अभिषेक काही शांत बसत नाही आणि विकी जैनही वाद घालत राहतो. अभिषेक कुमार जेव्हापासून घरात आला आहे, तेव्हापासून त्याचं वागणं साऱ्यांना खटकत आहे. याउलट विकी जैनचे संपूर्ण लक्ष खेळावर आहे. खेळ जिंकण्यासाठी तो शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.