बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : विकी जैनला नको नको ते बोलला अभिषेक, नवऱ्याचा झालेला अपमान पाहून भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली, “तू वयावरुन… “

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 12, 2023 | 4:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : विकी जैनला नको नको ते बोलला अभिषेक, नवऱ्याचा झालेला अपमान पाहून भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली, "तू वयावरुन… "

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वादविवाद पाहणंही रंजक ठरतंय. सध्या प्रत्येक स्पर्धक उत्तम खेळी खेळताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा समीकरणे बदलत असताना पाहायला मिळतात. ‘बिग बॉस’च्या घरात कधी मैत्री तर कधी शत्रुत्व पाहायला मिळते. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला स्पर्धकांमध्ये मैत्री पाहायला मिळाली मात्र कालांतराने जसजसा खेळ सुरु झाला तशी त्यांच्यातील मैत्री कमी होत गेली.

अशातच ‘बिग बॉस १७’च्या सुरुवातीला दोन स्पर्धकांमध्ये चांगलंच बॉण्डिंग पाहायला मिळालं. यानंतर आता या दोन स्पर्धकांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हे दोन स्पर्धक म्हणजे अभिषेक कुमार व विकी जैन. या दोन स्पर्धकांमध्ये चांगलीच बॉन्डिंग पाहायला मिळाली. मात्र आता त्यांच्या मैत्रीत दरार आली असल्याचं पाहायला मिळतंय. अभिषेक व विकीमध्ये भांडण जोरदार भांडण झाले आहे.

आणखी वाचा – “नवऱ्याबरोबर ‘बिग बॉस’मध्ये जाऊ नकोस”, चाहतीने सल्ला देताच सोनाली कुलकर्णीचे उत्तर, म्हणाली, “तिथे कधीच…”

‘बिग बॉस’ने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अभिषेक व बाबू भैया भांडी धुताना दिसत आहेत. अभिषेक विकीला फोन करतो आणि भांडी ठेवायला सांगतो. तर विकी म्हणतो, “मी का काम करू? ते तुमचे काम आहे”. तर यावर अभिषेक म्हणतो की, “मग ड्युटी बदलण्यात येईल. माझ्या वाटेला जास्त काम येत आहे”. यानंतर विकी व अभिषेक यांच्यात वाद सुरु होतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते प्रिया बापट, वाढदिवसानिमित्त शेअर केले विविध व्हिडीओ, म्हणाली, “आपला वेडेपणा…”

अभिषेक विकीला सांगतो की, “तू माझ्याशी भांडू नकोस. वयाच्या चाळीशीत या सर्व गोष्टी करू नकोस. नालायक व्यक्ती” असा अपशब्द वापरत तो त्याला बोल लगावतो. यादरम्यान अंकिता या भांडणामध्ये पडते. तेव्हा ती अभिषेकला पुन्हा पुन्हा वयावरून बोलू नकोस असे सांगते. मात्र अभिषेक काही शांत बसत नाही आणि विकी जैनही वाद घालत राहतो. अभिषेक कुमार जेव्हापासून घरात आला आहे, तेव्हापासून त्याचं वागणं साऱ्यांना खटकत आहे. याउलट विकी जैनचे संपूर्ण लक्ष खेळावर आहे. खेळ जिंकण्यासाठी तो शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.

Tags: Abhishek kumarbigg bossbigg boss 17Bigg Boss marathi newssalman khanvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
munawar farooqui shared about his personal life

आईचं निधन, बायकोही पळून गेली अन्…; खासगी आयुष्याबाबत मुनव्वर फारुकीचा मोठा खुलासा, म्हणाला, "तिने दुसरं लग्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.