शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तीन वर्ष तू माझ्यासाठी…”, विकी जैन बायकोला देत असलेली वागणूक प्रेक्षकांनाही पटेना, अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, म्हणाली, “मी सगळं…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 12, 2023 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss vicky jain calls better cook to khanzaadi front of his wife ankita lokhande in upcoming episode

Bigg Boss 17 : "तीन वर्ष तू माझ्यासाठी…", विकी जैन बायकोला देत असलेली वागणूक प्रेक्षकांनाही पटेना, अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, म्हणाली, "मी सगळं…"

‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहतात. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अशातच या शोचा एक् नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्येही त्या दोघांमध्ये वाद होताना दिसत आहे. स्वयंपाक घरात जेवण बनवताना विकी अंकिताला जेवणावून टोमणा मारतो आणि त्याच्या बोलण्यामुळे तिला रडू येते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होतात. (Bigg Boss 17 New Promo)

या नवीन प्रोमोमध्ये,  विकी खानजादीच्या जेवणाचे कौतुक करत आहे. तिला ‘चांगला स्वयंपाकी’ म्हणत अंकिताला त्याने टोमणा मारला आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होताना दिसत आहे. दरम्यान अंकिता, विकी व खानजादी स्वयंपाक करताना अंकिता खानजादीकडून काही सूचना घेत असते. तेव्हा विकी खानजादीला “तूच बनव” असं म्हणतो. यावर अंकिता “मी सुद्धा चांगले जेवण बनवू शकते”असं म्हणते. यावरुन त्यांच्यात बाचाबाची सुरू होते. यावेळी विकी अंकिताला “खानजादी तुझ्यापेक्षा जास्त चांगलं जेवण बनवते” असे उत्तर देतो. यावरूनच त्यांच्यात भांडणादरम्यान अंकिताला रडू येते आणि ती रडता रडताच हे जेवण मी बनवलं नसल्याचे विकीला सांगते.  

PROMO #BiggBoss17 #VickyJain and #AnkitaLokhande fight again pic.twitter.com/JvUUDatB9E

— The Khabri (@TheKhabriTweets) December 11, 2023

आणखी वाचा – Video : आर्या आंबेकरची मोठी फसवणूक, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “माझ्या परवानगीशिवाय त्यांनी…”

यापुढे विकी “तू तीन वर्षात काय केलं आहेस?” असं बोलतो. यावर अंकिताही “मी सगळं प्रेमाने बनवत होती” असं म्हणत त्याला उत्तर देते. यावर विकी “हे सांगायची गरज नाही. शंभर लोक बघतात. शंभर लोक ऐकतात. तू कधीतरी प्रेमाने बोलत जा” असं म्हणतो. यावर अंकिताही त्याला म्हणते, “मी प्रेमानेच बोलत आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे” यावर विकी तिला “नाही, तू नाही करत आहेस. मी जास्त बोलत आहे असं तुला वाटतं असेल तर आजपासून माझ्याशी बोलणं बंद कर” असं रागाने म्हणतो. यावर अंकिताला आणखी रडू येते. ‘बिग बॉस’च्या घरात होणारे अंकिता-विकी यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही आहेत. त्यांच्यात सतत काहीना काही कारणावरून भांडण होत आहे. अशातच आणखी एका वादाची भर पडली आहे.  

आणखी वाचा – Video : “जीजू कुठे आहेत?”, प्रश्न विचारताच लाजली पूजा सावंत, हसतच राहिली अन्…; म्हणाली, “ते लवकरच…”

दरम्यान, या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत विकी अंकिताबरोबर ज्यापद्धतीने वागला व बोलला आहे. त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. विकी घरातील सर्वांबरोबर चांगलं वागताना दिसतो, पण तो अंकिताबरोबर असे का वागतो? विकी अंकिताबरोबर हे असं मुद्दाम वागत आहे? विकी कधीकधी अंकिताबरोबर खूपच विचित्र वागतो? तो हे असं ठरवून बागत असेल तर हे चांगले नाही, त्याच्या अशा वागण्यामुळे अंकिताची दया येते” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी विकीला खडे बोल सुनावले आहेत.     

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmententertainment newskhanzaadivicky jain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
neha pendse troll

"ही काय फॅशन आहे?", नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, "मांडी दाखवणं इतकं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.