शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद खांडेकर पाठोपाठ विशाखाच्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून बाहेर पडताच नम्रता संभेरावचीही पोस्ट, म्हणाली, “काळजावर दगड ठेवून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 9, 2023 | 2:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Namrata Sambherao On Kurrrr

प्रसाद खांडेकर पाठोपाठ विशाखाच्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून बाहेर पडताच नम्रता संभेरावचीही पोस्ट, म्हणाली, "काळजावर दगड ठेवून…"

अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी कुर्रर्रर्रर्र नाटकातून एक्झिट घेतली असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. विशाखा सुभेदार यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावरून पोस्ट करत शेअर केली. त्यानंतर आता प्रसाद खांडेकरने नाटकातून एक्झिट केल्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं, व नाटकाच्या आगामी प्रयोगांसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री नम्रता संभेरावनेही नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे. (Namrata Sambherao On Kurrrr)

नम्रताने नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोस्ट शेअर करत, “‘कुर्रर्रर्रर्र’. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. या नाटकातील माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातील अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस याच नाटकाने मला मिळवून दिलं. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अत्यंत व्यस्त श्येड्युलमधून आम्ही ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाचे २ वर्षात २०० हुन अधिक प्रयोग केले. पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली” असं म्हटलं.

आणखी वाचा – “नाटकातील बदलावरुन…”, विशाखाच्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “आयुष्यातील अत्यंत…”

यापुढे तिने, “बॅकस्टेज व आमच्या सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावेत यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो हे पहिल्यांदा अनुभवलं पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे. नाटकासाठीचं घेतला आहे. तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्वीकार कराल अशी खात्री आहे. यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकावर, नवीन संचावर कराल अशी अशा आहे” असंही म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

आणखी वाचा – सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, मात्र प्रेक्षकांनी केलं ट्रोल, म्हणाले, “तेव्हाच त्याची आठवण येते कारण…”

पुढे नम्रताने शुभेच्छा देत, “मी अजूनही म्हणत आहे की, कारण शारीरिकरित्या एक्झिट घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेले आहे आणि तिथून कधीच एक्झिट होत नसते. माझ्या शुभेच्छा कायम असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई, विनोदाचा बाप पॅडी दादा, माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि सुप्रीम प्रियदर्शन दादा तुम्हाला व ‘कुर्रर्रर्रर्र’च्या सर्व टीमला पुढील प्रयोगांसाठी हाऊसफुल्ल शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरचं” असंही म्हटलं.

Tags: entertainmentkurrrrmarathi actressmarathi playnamrata sambheraoprasad khandekarvishakha subhedar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi actor subodh bhave talk on todays youth and their social media use

"महाराष्ट्र अजून चिखलात जात आहे आणि…", सुबोध भावेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "प्रभू श्रीराम असल्यासारखं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.