रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला चड्डी काढायला…”, ‘अ‍ॅनिमल’च्या ‘त्या’ सीनवरुन उपेंद्र लिमयेंचं भाष्य, म्हणाले, “बायको, मुलांना लाज वाटेल असं…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 8, 2023 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor upendra limaye talk about his scene in ranbir kapoor animal scene see details

“मला चड्डी काढायला…”, ‘अ‍ॅनिमल’च्या ‘त्या’ सीनवरुन उपेंद्र लिमयेंचं भाष्य, म्हणाले, “बायको, मुलांना लाज वाटेल असं…”

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि अजूनही हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पात्र ठरत आहे. बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना व अनिल कपूर यांच्या दमदार भूमिका असलेल्या चित्रपटात मराठी कलाकारांनीदेखील आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. यात अभिनेता उपेंद्र लिमये हे पाहुणे कलाकार म्हणून असले तरी चित्रपटावर त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे. अशातच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटातील सीनबद्दल भाष्य केलं आहे.

‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले की, “संदीप रेड्डी वांगाने माझी दोन ते तीनच कामं पाहिली आहेत. पण त्याला असं वाटत होतं की, चित्रपटातील ‘फ्रेडी’ ही मराठी भूमिका उपेंद्रनेच करायला हवी. संदीप रेड्डी वांगाचा मराठी सहाय्यक दिग्दर्शक जितेंद्र भोसले होता. या भूमिकेसाठी तो मला सहा महिने संपर्क साधत होता. एक सीन आहे तो करणार का? असं तो मला सतत विचारत होता. पण मी त्याला नकार देत होतो. दरम्यान एकेदिवशी सहाय्यक दिग्दर्शकाने संदीपबरोबर माझी मीटिंग करुन दिली. तेव्हा मला त्यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तयार केलं. यावेळी संदीपने मला माझ्या चित्रपटातील भूमिकेविषयी व सीनविषयी सांगितले. त्यामुळे बॉलिवूडच्या इतक्या मोठ्या सुपरहिट चित्रपटाचा मला भाग होता आलं, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. या भूमिकेसाठी उपेंद्र पाहिजे ही संदीपची मनापासून इच्छा होती.

आणखी वाचा – बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त केली अन्…

यापुढे त्यांनी असे म्हटले की, “मी या चित्रपटासाठी दिग्दर्शकाच्या मागे लागलो नाही. टी सीरिजचा मोठा चित्रपट येत आहे. संदीप भाऊ मला चित्रपटामध्ये काम करायचंच आहे, मला कृपया भूमिका द्या असं मी फोन करुन बोललो नाही. असा माझा कोणताच स्ट्रगल नव्हता. हा चित्रपट मी नाकारत होतो. बऱ्याच जणांनी आता चित्रपटही पाहिला आहे. यातील माझी चड्डी काढली जाणार असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले. तेव्हा मी म्हणालो, “चड्डी काढायला मला काही प्रॉब्लम नाही. पण घालणार कोण आहे?” यावर संदीप म्हणाला “रणबीर कपूर” यावर मीही रणबीर चड्डी काढणार असेल तरच मी चड्डी काढतो.” असं म्हटलं. कारण असे अनेक मुद्दे असतात. माझी बायको, मुलगा आहे त्यांना आपल्या कामाची लाज तर वाटणार नाही ना याचा सुद्धा विचार करावा लागतो. बाबा तू हे करायला नको होतं हे मुलांकडून यायला नको.”

आणखी वाचा – “स्पॉटबॉयने माझ्या मुस्काटात…”, मिळालेल्या प्रसिद्धीमुळे उपेंद्र लिमयेंची बदलली होती वागणूक, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाले, “माझा अहंकार दुखावला अन्…

दरम्यान, एका आर्मी ऑफिसरच्या मुख्य भूमिकेतून उपेंद्रने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर त्याच्या ‘चांगभलं’ या डायलॉगने तो चित्रपटगृहातील प्रेक्षकांची दाद मिळवतो. त्यामुळे चित्रपटात अनिल कपूर, रणबीर कपूर, बॉबी देओलसारखे बॉलिवूडमधील मोठे स्टार्स असले तरी मराठमोळे उपेंद्र लिमये चांगलेच भाव खाऊन गेले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

Tags: animalanimal moviebollywood newsentertainmententertainment newsUpendra limayeupendra limaye on animal
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
actor junior mehmood passes away

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त केली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.