शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आईचं निधन, पडता काळ अन्…; सुप्रिया पाठारे पुन्हा हॉटेल सुरु करणार, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दोन महिन्यांनंतर…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 7, 2023 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress supriya pathare will start maharaj hotel from tomorrow video shared on insatagram

Video : आईचं निधन, पडता काळ अन्...; सुप्रिया पाठारे पुन्हा हॉटेल सुरु करणार, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, "दोन महिन्यांनंतर..."

मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. आजवर त्यांनी अनेक विविधांगी भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. सुप्रिया या एक उत्तम अभिनेत्री आहे हे तर आपण जाणतोच. पण त्या एक उत्तम व्यावसायिकाही आहेत. त्यांचा मुलगा मिहीर पाठारे हा एक शेफ असून या मायलेकाने एक नवीन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फूड ट्रकपासून सुरु झालेल्या या व्यवसायाने पुढे हॉटेलपर्यंत मजल मारली.    

ठाण्यातील केवडा सर्कल येथे ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूड कॉर्नर या नावाने त्यांनी त्यांचं नवीन हॉटेल सुरू केलं. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी या हॉटेलला भेटी देत हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घेतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मध्यंतरी हे हॉटेल बंद होणार असल्याच्या अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. यावर सुप्रिया यांनी स्पष्टीकरण देत व्हिडीओ शेअर केला होता. आईच्या निधनामुळे काही दिवस हॉटेल बंद झाल्याचे त्यांनी या व्हिडीओद्वारे सांगितले होते. यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत काही तांत्रिक अडचणींमुळे हॉटेल बंद होणार असल्याचे सांगितले होते.

View this post on Instagram

A post shared by Supriya Pathare (@supriya_pathare75)

आणखी वाचा – Video : पियुष रानडेच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा, मेहंदी कार्यक्रमही थाटात केला अन्…; व्हिडीओमध्ये नाचताना दिसली सुरुची अडारकर

अशातच सुप्रिया यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे त्यांनी ‘मharaj’ हॉटेल पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी असे म्हटले आहे की, “२ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर उद्या (८ डिसेंबर) पासून ‘मharaj’ हॉटेल पुन्हा सुरू होत आहे” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. याबरोबरच यापुढे त्यांनी हॉटेलचा पत्ताही दिला आहे.  

आणखी वाचा – “रिलेशनशिपला कुटुंबियांकडून विरोध आणि…”, बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेबाबत बोलताना शिवानी सुर्वेचा खुलासा, म्हणाली, “फक्त आकर्षण…”

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओखाली खव्वयांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त  केला आहे. त्याचबरोबर हॉटेल पुन्हा एकदा नव्याने सुरू होत असल्यामुळे ठाण्यातील खवय्यांसाठी ही आनंदाची बातमी आहेत आणि खव्वये यासाठी चांगलेच आतुर आहेत. त्याचबरोबर सुप्रिया आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार? यासाठी त्यांचे चाहतेदेखील उत्सुक आहेत.  

Tags: entertainment newsmaharaj hotelmarathi actressmarathi entertainmentMarathi newssupriya pathare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi actress hemangi kavi answerd to trollers by sharing a post on her instagram story

"अशी जनावरं…", शारीरिक भागावरुन अश्लील कमेंट करणाऱ्यावर हेमांगी कवी भडकली, म्हणाली, "Bioमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.