मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिने अभिनेता पियुष रानडे याच्याबरोबर सात फेरे घेतले आहेत. सुरुचीने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही सुखद बातमी त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. त्याचे फोटो समोर येताच सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असताना आता सुरुचीने तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ नुकताच शेअर केला. (suruchi adarkar mehendi function)
मेहंदीच्या कार्यकमासाठी हे जोडपं खूप छान तयार झालं होतं. या कार्यक्रमात सुरुचीने फिकट जांभळ्या रंगाचा फ्लोरल वनपिस घातला होता. त्यावर तिने मोठ्या आकाराचे डायमंडचे कानातले घातलेले पाहायला मिळाले. या साध्या पण सुंदर लूकमध्ये सुरुची खूप गोड दिसत होती. यावेळी पियुषनेही फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता. सुरुची तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात ठेका धरताना दिसली. या सोहळ्याच्या व्हिडीओत पियुष मेहंदीचं ताट सुरुचीजवळ घेऊन येतो. त्यानंतर तिच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात होते. प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहाल हे तिच्या मेहंदीतील खास आकर्षण ठरलं. तर त्याचबरोबर मेहंदीची सुंदर डिझाइन लक्षवेधी ठरली आहे. ताजमहालच्या बाजूला असलेलं झाड, त्याच्या दुसऱ्या बाजूला बसलेला मोर आणि त्याचा पिसारा हे सगळी अगदी सुंदररीत्या रेखाटलेलं दिसत आहे. त्याचबरोबर हिंदू धर्माचं प्रतिक असलेलं स्वस्तीक मेहंदीवर खूप उठून दिसत आहे. त्याचबरोबर पक्षांची, प्राण्यांची व फुलांची डिझाइन यामुळे मेहंदीच्या छान व सुंदर डिझाइनने सुरुचीची मेहंदी पूर्ण होते. या व्हिडीओला सध्याचं ट्रेंन्डिंग ‘कुडीये नी’ हे गाणं आणखीनच छान अंदाज देत आहे. सुरुचीने, ‘स्वप्नवत मेहंदी’, असं कॅप्शन देत हा गोड व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने खूप गोड दिसत आहात. तुम्हाला एकत्र बघून खूप आनंद झाला, असं लिहीत कमेंट केली आहे तर दुसऱ्या नेटकऱ्याने, सूपर जोडी म्हणत या नवविवाहीत जोडीचं कौतुक केलं आहे.
पियुष-सुरुची ही जोडी ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आली होती. त्यानंतर ‘अंजली’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही सुरुची दिसली होती. तर पियुष सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.