शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला मुंबईत मिळालं म्हाडाचं घर, आईच्या वाढदिवसानिमित्त गृहप्रवेश व पूजा केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 7, 2023 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss marathi fame actor akshay kelkar shared videpo of his new home puja and mother birthday celebration

Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला मुंबईत मिळालं म्हाडाचं घर, आईच्या वाढदिवसानिमित्त गृहप्रवेश व पूजा केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनतदेखील घेत असतो. काहींच्या बाबतीत ही स्वप्नपूर्ती होते तर काहींना यासाठी वेळ लागतो. मात्र गेल्या काही दिवसांत मराठीतील अनेक कलाकारांनी मुंबईत घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे. रुचिता जाधव, पृथ्वीक प्रताप, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी यांनी नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. अशातच ‘बिग बॉस मराठी ४’ चा विजेता व अभिनेता अक्षय केळकरनेही मुंबईत त्याचं स्वत:चं नवीन घर घेतलं. सोशल मीडियावर याचा खास व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.   (Akshay Kelkar On Instagram)

या व्हिडीओमधून त्याने नवीन घराची झलक दाखवली होती. ’माझं मुंबईतील पहिलं घर’ असं म्हणत त्याने हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “२०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच घर. काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांबरोबर म्हाडाच्या बिल्डींगमध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये यावर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो” असं म्हणत त्याने त्याच्या नवीन घराची खास झलक शेअर केली होती. अशातच त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांबरोबर नवीन घराच्या गृहप्रवेश पूजेचे खास क्षण शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Video : बीचवर रोमँटिक डेट, घट्ट मिठी मारली अन्…; बायकोने दिलेलं सरप्राइज पाहून प्रवीण तरडेही भारावले, सुंदर व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

अक्षयने आईच्या वाढदिवसाचे खास औचित्य साधत नवीन घरात प्रवेश केला आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त त्याने नवीन घराची पूजा आयोजित केली होती. याचाच खास व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात घराची पूजा होताना दिसत आहे. गृहप्रवेश केला जात आहे. त्याचबरोबर या व्हिडीओत त्याचे आई-बाबा व आजी-आजोबा गृहप्रवेश करताना दिसत आहे. या गृहप्रवेशानंतर संपूर्ण केळकर कुटुंबाने वाढदिवसनिमित्त केक कापत आईचा वाढदिवस साजरा केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे. या व्हिडीओखाली अक्षयच्या चाहत्यांसह कलाकार मंडळींनी त्याला नवीन घराबद्दल अभिनंदन करत त्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याच्या आईलाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – ११ वर्षांचा संसार, त्या गाण्यावर पटली अन्…; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेमंत ढोमेची भन्नाट पोस्ट, म्हणाला, “येड्या पाटलाला…”

दरम्यान, अक्षयने ‘बिग बॉस’च्या गेल्या पर्वाचे विजतेपद पटकावले होते. त्यानंतर तो कलर्स वाहिनी वरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमात त्याने सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यानंतर आगामी काळात तो कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार? याची चाहते वाट पाहत आहेत.

Tags: akshay kelkarbigg boss marathientertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi movie theater issue

‘एकदा येऊन तर बघा’ला थिएटर मिळेना;  प्रसाद खांडेकर नाराज, प्रवीण दरेकरांनी मुद्दा मांडताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी चित्रपटांना...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.