शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘एकदा येऊन तर बघा’ला थिएटर मिळेना;  प्रसाद खांडेकर नाराज, प्रवीण दरेकरांनी मुद्दा मांडताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठी चित्रपटांना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 7, 2023 | 3:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi movie theater issue

Marathi movie theater issue

मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत हा मुद्दा गेली कित्येक वर्ष जैसे थे आहे. प्रेक्षकांना चित्रपट बघण्याची इच्छा असली तरी काही ठिकाणी मराठी चित्रपटांना शो मिळत नसल्याची बाबही आजपर्यंत समोर आली आहे. आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची खंत अभिनेता प्रसाद खांडेकरने व्यक्त केली होती. त्याचा हाच मुद्दा विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेत मांडला आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. (Devendra Fadnavis On Marathi Movie )

प्रसादचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट ८ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अधिकाधिक शो मिळावे म्हणून तो सध्या प्रयत्न करत आहे. याचबाबत प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेत म्हटलं की, “अध्यक्ष महोदय,  बोरीवलीमधील प्रसाद खांडेकर हा एक अभिनेता आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून तो लोकप्रिय झाला. त्याचा ८ डिसेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट येत आहे. पण सिनेमामधील काही बॉस, दाद लोक आहेत ते मराठी चित्रपटांना थिएटर मिळवून देत नाहीत”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – लग्नानंतर पियुष-सुरुची यांच्या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो व्हायरल, डिझायनर गाऊनमध्ये दिसली नवी नवरी

यापुढे त्यांनी विनंती केली की, “प्रसाद खांडेकर हा मराठी तरुण सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या चित्रपटाला थिएटर मिळायला पाहिजे यासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे ही माझी विनंती आहे”. प्रवीण दरेकरांनी आपलं मत मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर भाष्य करत एक आश्वासन दिलं.  

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला मुंबईत मिळालं म्हाडाचं घर, आईच्या वाढदिवसानिमित्त गृहप्रवेश व पूजा केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, “प्रसाद खांडेकर अतिशय गुणी कलाकार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून गेले काही वर्ष प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं आहे. जर मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसतील तर गरजेनुसार कारवाईही करण्यात येईल. पण थिएटर उपलब्ध करुन देण्यात येतील”. आता या आश्वासनानंतर ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाला कितपत थिएटर मिळतात, तसेच मराठी चित्रपटांना थिएटर न मिळणं यावर कायमचा तोडगा निघणार का? हे पाहावं लागेल.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi movieprasad khandekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
marathi actor subodh bhave shared appriciation post for jhimma 2 marathi movie all team and audience

हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही 'झिम्मा २'ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, सुबोध भावेची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "आमचा मराठी चित्रपट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.