शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘अ‍ॅनिमल’मध्ये उपेंद्र लिमये आहेत हे गुपित का ठेवण्यात आलं?”, प्रश्न विचारताच अभिनेत्यानेच दिलं खरं उत्तर, म्हणाले, “आधीच सांगितलं असतं तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 6, 2023 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Upendra limaye On Animal

"'अ‍ॅनिमल'मध्ये उपेंद्र लिमये आहेत हे गुपित का ठेवण्यात आलं?", प्रश्न विचारताच अभिनेत्यानेच दिलं खरं उत्तर, म्हणाले, "आधीच सांगितलं असतं तर..."

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाचे वादळ बॉक्स ऑफिसवर धडकले आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे तिकीट मिळणे कठीण झालं होतं. त्यानंतर चित्रपट प्रदर्शनानंतर अगदी पहिल्या दिवसापासून हा शो हाऊसफुल्ल असलेला पाहायला मिळत आहे. १०० कोटींचे बजेट असलेल्या या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने दोनच दिवसांत बजेटचा आकडा पार केला आहे. (Upendra limaye On Animal)

रणबीर कपूर अभिनीत या सिनेमात रश्मीका मंदाना, अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत. तसेच अभिनेता बॉबी देओलही या सिनेमात खास भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात एका खास कलाकाराच्या एन्ट्रीने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकाराने घातलेला कल्ला साऱ्या रसिक प्रेक्षकांना वेड करून सोडत आहे.

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात उपेंद्र लिमयेंना करायचं नव्हतं काम, अभिनेत्याचा पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाले, “नकार दिला आणि….”

सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या दमदार आवाजाचे अनेक फॅन आहेत. अगदी आवाजाचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनीही उपेंद्र यांच्या आवाजाचे कौतुक केले. दमादर आवाज व रावडी भूमिकेसह उपेंद्र लिमये ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेने अनेकांच्या मनात घर केलं. प्रेक्षकवर्ग त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करताना दिसत आहे. अशातच उपेंद्र यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल, एकूणच चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – चेन्नईमधील पुरात २४ तास अडकला आमिर खान, बोटीच्या सहाय्याने अभिनेत्याला बाहेर काढलं अन्…; फोटो व्हायरल

उपेंद्र लिमये यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ या चॅनेलला एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी चित्रपटात काम करण्याबाबत चित्रपट प्रदर्शनापूर्वी कुठेही माहित नसल्याचा खुलासा केला. उपेंद्र लिमये म्हणाले, “दिग्दर्शकाला मी माझं हे पात्र पाहुणा कलाकार म्हणून ठेवायला सांगितलं होतं. आणि त्यालाच माझी ही भूमिका सरप्राईज म्हणून ठेवायची होती. त्यात मी माध्यमांपासून दूर असल्यामुळे पहिला सेल्फी, शूटिंग दरम्यान काढलेला फोटो स्टोरीला पोस्ट करणं याच्याशी माझा काही फारसा संबंध येत नाही. त्यामुळे याबाबत कोणाला कळलं नाही. अगदी जगभरातून माझ्या या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे, मला मॅसेज, फोनकॉल्स करून जवळची, लांबची नातेवाईक मंडळी सांगत आहेत. जर मी आधीच चित्रपटात काम करत आहे असं सांगितलं असतं तर त्याने तसा काही फरक पडला नसता” असं म्हणत उपेंद्र यांनी चित्रपटात भूमिका साकारत असल्याचा खुलासा न केल्याबाबत भाष्य केलं.

Tags: animalanimal moviebollywood movieentertainmentmarathi actorUpendra limayeupendra limaye on animal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Mahaparinirvaan Movie First Look

'महापरिनिर्वाण' चित्रपटातील प्रसाद ओकच्या फर्स्ट लूकने वेधलं लक्ष; गौरव मोरेची भूमिका पाहता प्रेक्षकही भारावले, व्हिडीओ पाहिलात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.