‘बिग बॉस १७’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. भांडणं, वादावादी यामुळे हा कार्यक्रम पहिल्यापासूनच चर्चेत आहे. अंकिता व विकी हे जोडपं तर ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून चांगलंच चर्चेत आहे. अंकिता बऱ्याचदा तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत गुंतलेली पहायला मिळते. यापूर्वीही तिने या शोमध्ये आल्यापासून सुशांतची बऱ्याचदा आठवणीत रमताना व भावनिक होतानाही दिसते. आताही तिने सुशांतबरोबरच्या ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमाच्या आठवणी सांगितल्या.(Ankita admits she was possessive about sushant singh)
अंकिता व सुशांत ‘झलक दिखला जा’ या डान्स कार्यक्रमाच्या ४थ्या पर्वात दिसले होते. यावेळच्या आठवणी सांगताना अंकिताने सांगितलं होतं की सुशांतच्या जवळ दुसरी कोणती व्यक्ती आल्यास तिला बरंच असुरक्षित वाटायचं. याबाबत नुकतंच ती ‘बिग बॉस’च्या घरात बोलताना दिसली. ‘बिग बॉस’च्या लाइव व्हिडीओमध्ये अंकिताला या गोष्टींबाबत बोलताना पाहिलं गेलं. यावेळी तिच्याबरोबर ईशा मालवीय व अभिषेक कुमार होते. अंकिता सांगते की, “’झलक दिखला जा’मध्ये टॉप ५ मध्ये असताना सुद्धा मी इतकी फोकस नव्हते. मी या शोदरम्यान मध्येच बाहेर चालायला निघून जायची. मी बऱ्याचदा निशांत (कदाचित निशांत भट्ट)ला सांगायचे की ही स्पर्धा आपण सोडू”.
For those who are saying how dare #AnkitaLokhande talk about SSR? Listen, Ankita has the right to talk about SSR as they were in a relationship. You won't decide what Ankita says; many of you didn't even watch his movies when he was alive.pic.twitter.com/VzO8U5P1Eg
— Lady Khabri (@KhabriBossLady) December 3, 2023
अभिषेकने पुढे अंकिताला सुशांतबाबत विचारलं की तो कुठपर्यंत पोहोचला होता? त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “तो पहिल्या दोनमध्ये होता. मी त्याला म्हणाले होते की तू हर आता. जर जिंकलास ना तर बरीच गडबड होईल. त्याला सगळ्यात पहिल्यांदा तीस गुण मिळाले होते. त्याचे हे गुण पाहता मी चकीत झाले. मला कळेना याला कसे तीस गुण मिळाले”. त्यावेळी तिला ईशाने विचारलं, “कोण होती तिची डान्स पार्टनर?” यावर अंकिता म्हणाली, “चांगली होती”.याबाबत पुढे सांगताना ती म्हणाली, “ती खूप चांगली डान्सर होती. सुशांत डान्स करताना तिने सुशांतला मिठी मारली. हे पाहता मला खूप वाईट वाटलं. सुशांतच्या जवळ कोणती मुलगी आली तरी मला असुरक्षित वाटायचं. आता माझ्यात खूप बदल झाला आहे. मला पूर्वी खूप राग यायचा. मी पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायचे. आता मी खूप शांत झाले आहे”.
तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनीही अंकिताच्या या वक्तव्यावार तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर या वक्तव्यावरून, “ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोलत आहेत”. एकाने नेटकऱ्यांने सांगितलं, “अंकिताने हे सगळं सुंदर भूतकाळ म्हणून स्विकारलं पाहिजे. वर्तमानकाळ म्हणून तिने याचा विचार करू नये. कारण असं वागून ती विकी जैनबरोबर खूप चुकीचं वागत आहे. जर ती आतापर्यंत यासगळ्यातून सावरली नाही आहे तर तिने विकीबरोबर लग्न का केलं?”, असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे.