रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Animal Vs Sam Bahadur : ‘अ‍ॅनिमल’चा विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ला फटका बसणार?, कोणता चित्रपट ठरणार वरचढ?, आतापर्यंतची कमाई आहे तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 1, 2023 | 2:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Animal Vs Sam Bahadur Advance Booking

Animal Vs Sam Bahadur

Animal Vs Sam Bahadur Advance Booking : ‘अ‍ॅनिमल’ व ‘सॅम बहादुर’ या दोन्ही बिग बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ व विकी कौशल अभिनीत ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकत्र धडकले आहेत. कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट वडील मुलाच्या नात्याची भावनिक गोष्ट सांगत आहेत, तर मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेला पाहायला मिळत आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनचं चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग सुरु झाले. आता चित्रपटांचे तिकीटही मिळणं कठीण होऊन बसलं आहे. दोन्ही चित्रपटांत नेमका कोणता चित्रपट वर्चस्व गाजवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आणखी वाचा – Animal Review : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट पाहावा की नाही? पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले, “सिनेमा सुरु झाला अन्…”

Sacnilk.com ने दिलेल्या अहवालानुसार, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने जोर मारलेला पाहायला मिळत आहे. संपूर्ण भारतात, चित्रपटाने पहिल्याच दिवशी १३.९५ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे, ‘सॅम बहादुर’ने आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवशी १.८१ कोटी रुपये कमावले आहेत. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवसाच्या हिंदी भाषिक बुकिंगमधून चित्रपटाने सुमारे १७.१ कोटी कमावले आहेत. १०,००० हून अधिक शोसाठी ५.७५ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. तर ‘सॅम बहादुर’ने सुमारे १.८१ कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे ५७,८८८ तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट ३,००० हून अधिक स्क्रीनवर दाखवला जाणार आहे.

आणखी वाचा – “या गोष्टी सोप्या नाहीत”, नीना गुप्ता यांच्या स्त्रीवादावर अखेर कंगना रनौत स्पष्टचं बोलली, म्हणाली, “पुरुषांना महिन्यातून सात दिवस…”

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय चित्रपटात रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला असल्याची सर्वत्र चर्चा आहे. भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक ‘सॅम बहादुर’ हा मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा ​​हे कलाकार देखील आहेत. हा चित्रपट ५५ कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला असल्याची चर्चा आहे.

Tags: animalAnimal Vs Sam Bahadurbollywwod moviesam bahadurvicky kaushal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
R Subbalakshmi Passed Away

सुप्रसिद्ध अभिनेत्री आर सुब्बालक्ष्मी यांचं निधन, चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या आजीची साकारली होती भूमिका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.