शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्री आर सुब्बालक्ष्मी यांचं निधन, चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या आजीची साकारली होती भूमिका

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 1, 2023 | 3:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
R Subbalakshmi Passed Away

सुप्रसिद्ध अभिनेत्री आर सुब्बालक्ष्मी यांचं निधन, चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या आजीची साकारली होती भूमिका

R Subbalakshmi Passed Away : मल्याळम अभिनेत्री व संगीतकार आर. सुब्बलक्ष्मी यांनी गुरुवारी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक गायिका व संगीतकार असलेल्या या अभिनेत्रीने ‘नंदनम’ फेम पृथ्वीराजसह चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ‘कल्याणरामन’, ‘रप्पाकल’, ‘थिलककम’, ‘सीआयडी मूसा’, ‘पंडीप्पाडा’, ‘राणी पद्मिनी’ व इतर अनेक हिट चित्रपटांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

अनेक चित्रपटांमध्ये आजीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक तामिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. गौतम मेननच्या ‘विनयतांडी वरुवाया’मधील त्यांच्या भूमिकेसाठी तसेच ‘अम्मानी’ मधील मुख्य भूमिकेसाठी त्या विशेष चर्चेत होत्या. विजय स्टारर ‘बीस्ट’ या तामिळ चित्रपटातही त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत होत्या.

आणखी वाचा – Animal Vs Sam Bahadur : ‘अ‍ॅनिमल’चा विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ला फटका बसणार?, कोणता चित्रपट ठरणार वरचढ?, आतापर्यंतची कमाई आहे तब्बल…

साऊथ चित्रपटसृष्टीसह त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. ‘एक दीवाना था’ तसेच ‘दिल बेचारा’ चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आजी म्हणून साकारलेली हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष भावली. सुब्बलक्ष्मी यांनी दूरदर्शनसह अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच त्यांनी अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. त्यांच्या पश्चात अभिनेता, नृत्यांगना थारा कल्याणसह त्यांना तीन मुले आहेत.

Tags: bollywood actressbollywood movieR SubbalakshmiR Subbalakshmi deathsouth actresssouth movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
marathi singer aarya ambekar decided to stay away from social media and also challenged to her fans

आर्या आंबेकरचा मोठा निर्णय, सोशल मीडियापासूनही दूर राहणार, पोस्ट शेअर करत म्हणाली, “आपल्या आयुष्यात…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.