शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“या गोष्टी सोप्या नाहीत”, नीना गुप्ता यांच्या स्त्रीवादावर अखेर कंगना रनौत स्पष्टचं बोलली, म्हणाली, “पुरुषांना महिन्यातून सात दिवस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 1, 2023 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kangana Ranaut On Neena Gupta

"या गोष्टी सोप्या नाहीत", नीना गुप्ता यांच्या स्त्रीवादावर अखेर कंगना रनौत स्पष्टचं बोलली, म्हणाली, "पुरुषांना महिन्यातून सात दिवस..."

अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड चित्रपट तेजस मुळे विशेष चर्चेत होती. मात्र तिचा हा चित्रपटही फ्लॉप ठरला. कंगना रनौत ही तिच्या अभिनयाशिवाय स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा टोमणे मारत असते. मात्र, आज ही अभिनेत्री कोणाला टोमणा मारल्यामुळे नाही तर इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता हिला पाठिंबा दिल्याने चर्चेत आली आहे. एकीकडे नीना गुप्ता महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानांमुळे ट्रोल होत असताना दुसरीकडे कंगना राणौतने त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. (kangana Ranaut On Neena Gupta)

कंगनाने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला पाठिंबा दर्शविला आहे. पोस्ट शेअर करत कंगना म्हणाली, “नीना जी जे बोलल्या त्यावर इतक्या तीव्र प्रतिक्रिया का येत आहेत, हे मला कळत नाही आहे. स्त्री-पुरुष कधीही समान होऊ शकत नाही. ते प्रत्येक गोष्टीत एकमेकांपासून वेगळे आहेत. ते खरंच समान आहेत का? स्त्री-पुरुष सोडा, पण आपल्यापैकी कोणीही समान नाही” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आणखी वाचा – “मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर हेमंगी कवीने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाली “निर्मिती ताई तू कारणीभूत असशील कारण…”

यापुढे अभिनेत्री म्हणाली, “आपल्याकडे देव, गुरु, वरिष्ठ, पालक किंवा अगदी बॉसदेखील आहेत. यातील काही अधिक अनुभवी आहेत किंवा काही प्रत्यक्षात अधिक विकसित झाले आहेत, पण आपण कोणत्याही पातळीवर समान नाही. आम्हाला पुरुषाची गरज आहे का? अर्थातच आहे. जशी पुरुषाला एका स्त्रीची गरज असते. माझ्या आईला जर तिचे आयुष्य एकटेच जगावे लागले असते तर ते खूप अडचणींनी भरलेले असते. त्याचप्रमाणे माझे वडील देखील माझ्या आईशिवाय त्यांचे जीवन जगू शकत नाहीत. यात कसली लाज वाटते, हेच मला समजत नाही” असंही ती म्हणाली.

आणखी वाचा – अखेर ‘तारक मेहता’मध्ये होणार दयाबेनची एंट्री? जेठालाल, बापूजींनी केला खुलासा, नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

यापुढे स्त्री व पुरुषांबाबत कंगनाने लिहिलं आहे की, “पुरुषांना महिन्यातून सात दिवस रक्तस्त्राव (मासिक पाळी) होत नाही, तसेच त्यांच्यात ती दैवी स्त्री शक्ती नाही, ज्याच्यासाठी प्रत्येकजण तहानलेला असतो. मुलं स्वतःच्या घरात, बाहेर फिरताना असुरक्षित नाहीत, त्याच तुलनेत तरुण मुलींसाठी मात्र या गोष्टी अजिबात सोप्या नाहीत”, असं कंगनाने लिहिलं.

Tags: bollywood actressbollywood gossipentertainmentkangana ranautneena guptaneena gupta on feminismneena gupta statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Jhimma 2 Box Office Collection

‘झिम्मा २’ चित्रपटाची विक्रमी कमाई, सात दिवसांतच कमावले 'इतके' कोटी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.