सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : बाथरुम घाणेरडं, कपडेही उचलत नाही अन्…; अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’च्या घरात राहते घाणेरडी, ईशा मालवीयाचा आरोप, म्हणाली, “कित्येक दिवस…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 29, 2023 | 2:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
isha malviya fight with ankita lokhande on bathroom cleaning duty promo viral on social media

बाथरुम घाणेरडं, कपडेही उचलत नाही अन्...; अंकिता लोखंडे 'बिग बॉस'च्या घरात राहते घाणेरडी, ईशा मालवीयाचा आरोप, म्हणाली, "कित्येक दिवस..."

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. शो मध्ये रोजच प्रत्येक स्पर्धकात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होताना दिसत आहेत. प्रेक्षकांनादेखील आता या भांडणाची सवय झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील अधिक लोकप्रिय झालेली व्यक्ती म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. अंकिता ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अंकिता ही कधी विकी जैनबबरोबर भांडताना दिसते, तर काही घरातील इतर स्पर्धकांबरोबर वाद घालताना दिसते. नुकतच तिचे मन्नाराबरोबर देखील भांडण झाले होते. अशातच ती ईशा मालवीयबरोबरच्या भांडणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Ankita Lokhande And Isha Malviya Fight Video)

कलर्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात या दोघींमध्ये एका टास्कवरुन वाद झाल्याचे दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या आगामी भागात एक मजेशीर टास्क होणार आहे. घरातील जो व्यक्ती एकदा सांगूनही त्याचे काम नीट करत नाही आणि त्याला उपचारांची गरज आहे. अशा सदस्याला थेरपी रूममध्ये घेऊन जायचं आहे आणि या टास्कसाठी ईशा अंकिताची निवड करते. या दरम्यान त्यांच्यात जोरदार भांडण होतं.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते उदय सबनीसांची लेकही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच पटकावला फिल्मफेअर पुरस्कार, सर्वत्र होत आहे कौतुक

यापुढे ‘बिग बॉस’ या टास्कसाठी अंकिताचे नाव घेतात, तेव्हा ईशा तिला घेऊन थेरपी रूमकडे जाते. यादरम्यान ईशा अंकितावर वारंवार विनंती करूनही बाथरूम साफ करत नाही. तसेच ती घरातील कामे न करता दुसऱ्यांच्या भांडणात नाक खुपसत असल्याचा आरोप करते. थेरपी रूममध्ये जाताच ईशा अंकिताला असे म्हणते की, “तुम्हाला स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. तु तुझे कपडेदेखील अनेक दिवस उचलून ठेवत नाहीस. ते असेच पडलेले असतात. तुम्हाला काही बोललं तर पटकन रागही येतो.” यावर अंकितादेखील “तु स्वत:ला स्वच्छतेची देवी समजत असशील तर मग तूच कामे कर. मी या कामाबाबत काही अनुभवी नाही.” असं म्हणते. दरम्यान यावरून त्यांच्यात जोरदार भांडण होत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – ओरीनेच सांगून टाकलं ‘बिग बॉस १७’चा विजेता कोण होणार?, खुलासा करत म्हणाला, “त्याच्यामध्ये काहीतरी…”

गेला आठवडाभर अरुण महाशेट्टी, मन्नारा चोप्रा, अनुराग डोवाल, रिंकू धवन, खानझादी, विकी जैन, नील भट्ट आणि अंकिता लोखंडे यांच्यात नॉमिनेशनमुळे वाद होताना दिसत आहे. अशातच अंकिता व ईशा यांच्या भांडणाची भर पडली आहे. त्यामुळे या टास्कदरम्यान त्यांच्यातील हा वाद आणखी चिघळणार की दोघींपैकी कुणी माघार घेणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Tags: ankita lokhandebigg boss 17Bigg Boss 17 Ankita Lokhandeentertainment newsisha malviya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
Rupali Bhosale On Hema Malini

"तू सुंदर आहेस आणि…", 'आई कुठे…' फेम रुपाली भोसलेचं हेमा मालिनींनी केलं तोंडभरुन कौतुक, भेटता क्षणीच म्हणाल्या, "तुझा अभिनय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.