शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू आज आमच्यात नाही आणि…”, हार्दिक जोशीवर दुःखाचा डोंगर, वहिनीच्या निधनानंतर भावुक पोस्ट, म्हणाला, “तुला नमस्कार करायचो तेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 25, 2023 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hardeek Joshi Emotional Post

"तू आज आमच्यात नाही आणि…", हार्दिक जोशीवर दुःखाचा डोंगर, वहिनीच्या निधनानंतर भावुक पोस्ट, म्हणाला, "तुला नमस्कार करायचो तेव्हा…"

मराठमोळा अभिनेता हार्दिक जोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिक जोशीच्या मोठ्या भावाच्या बायकोचं निधन झाली असल्याची बातमी समोर आली आहे. हार्दिक जोशीच्या वहिनीचं आकस्मिक निधन झालं असल्याचं कळलं आहे. याबाबतची एक भावुक पोस्ट हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टवरील कॅप्शनने हार्दिक खचलेला असल्याचं कळतंय. जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी हार्दिकने पोस्ट शेअर करत दिली आहे. (Hardeek Joshi Emotional Post)

हार्दिकचे व त्याच्या वहिनीचे घट्ट नाते होते. आई, बहीण, मैत्रीण, वहिनी अशी सर्वच नाती त्या पार पाडत होत्या. हार्दिकने त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाही आहेस, पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. ‘जाऊ बाई गावात’ हा झी मराठीवरील नवीन शो मी करत आहे तो फक्त तुझ्यामुळे. तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करत आहे कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होत की हार्दिक काही झालं तरी हा शो तू करणारचं आहेस आणि योगायोग असा आहे की ४ डिसेंबरपासून हा शो टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे”.

आणखी वाचा – “लग्नाला ६० दिवस बाकी” म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरने शेअर केला फोटो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हार्दिकने पुढे लिहिलं आहे की, “मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवून तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. मिस यु ज्योती वहिनी. माझी लाडकी वहिनी मला कधीचं विसरु नको. खूप प्रेम आणि मला तुझी खूप आठवण येत राहील” असं म्हणत त्याने ही भावुक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by HARDEEK JOSHI (Hardik joshi) (@hardeek_joshi)

आणखी वाचा – ‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्सऑफिस कलेक्शन समोर, चित्रपटगृहांमध्ये गर्दी, आतापर्यंत कमावले इतके कोटी

लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा रिअ‍ॅलिटी शो येत आहे. येत्या ४ डिसेंबरपासून त्याचा हा नवीन रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा टायटल ट्रॅक नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि या टायटल ट्रकला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Tags: entertainmenthardeek joshihardeek joshi emotionalhardeek joshi emotional postjau bai gavatmarathi actorzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
"तुझ्याशिवाय माझं आयुष्यच...", लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "माझ्या लेकामुळे..."

"तुझ्याशिवाय माझं आयुष्यच…", लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "माझ्या लेकामुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.