‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून या शो मधून ती घराघरात पोहोचली. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर तिची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंगदेखील आहे. अशातच तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. (Actress Priyadarshini Indalkar Shared Instagram Post)
प्रियदर्शिनीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. प्रियाने “लग्नाला ६० दिवस बाकी” अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. या पोस्टखाली तिने ‘नवरदेव’ व ‘जानेवारी २०२४’ असे हॅश्टॅगदेखील लिहिले आहेत.
आणखी वाचा – ‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्सऑफिस कलेक्शन समोर, चित्रपटगृहांमध्ये गर्दी, आतापर्यंत कमावले इतके कोटी
त्यामुळे ती खरंच लग्न करणार आहे? की तिचा कुठला नवीन चित्रपट येणार आहे? याविषयी चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान तिच्या या पोस्टखाली चाहत्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टखाली अनेकांनी तिला “अभिनंदन, आम्ही वाट बघत आहोत, इतक्या लवकर लग्न नको करूस” अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या पोस्टवरून तिचा कुठला तरी नवीन प्रोजेक्ट येणार असल्याचे ओळखले आहे.
दरम्यान प्रियदर्शिनी ही सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘शांतीत क्रांती’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात तिची महत्त्वाची भूमिका होती. या सिरिजमधील तिच्या भुमिकेचं कौतुकदेखील झालं होतं. आता तिच्या या पोस्टमुळे ती खरंच लग्न करणार आहे? की ती कुठल्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.