शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “दिग्दर्शकाकडे माझ्या काही मागण्या…”, कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “बाकी गोष्टी मी सांभाळून घेईन पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 25, 2023 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actor kushal badrike shared an funny Instagram video mentioning his demands from director viju mane in the caption

Video : "दिग्दर्शकाकडे माझ्या काही मागण्या आहेत", अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चत, म्हणाला, "बाकी गोष्टी मी सांभाळून घेईन पण…"

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा पडद्यावर अभिनय करत प्रेक्षकांना हसवतोच, पण तो सोशल मीडियाच्या माध्यमातूदेखील प्रेक्षकांना हसवत असतो. तो कधी त्याच्या कामाबद्दलचा कोणता किस्सा, स्वत:बरोबर घडलेला काही प्रसंग किंवा मित्रांबरोबरचे काही मजेशीर व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. तसेच काही फोटो शेअर करत तो त्याखाली हटके कॅप्शन लिहत तो चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेतो. अशातच नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Actor Kushal Badrike Shared Video On Instagram Account)

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दिग्दर्शक व त्याचा खास मित्र विजू मानेबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओखाली त्याने हटके कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलेल्या या कॅप्शनमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशलने या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये दिग्दर्शकाकडे त्याच्या काही मागण्या केल्या आहेत. त्याने असं म्हटलं आहे की, “दिग्दर्शक हा जहाजाच्या कॅप्टनसारखा असतो हे खरं आहे. पण दिग्दर्शक जेव्हा तुमचा मित्र असतो तेव्हा ती जहाज आपल्याच बापाची आहे अश्या आविर्भवात जगणारी आम्ही माणसं आहोत. तर ह्या कॅप्टनकडे माझ्या काही मागण्या आहेत. कॅप्टनचे कपडे मला घट्ट होतात, तेव्हा त्याने स्वतः साठी थोडे वाढत्या अंगाचे कपडे घ्यावेत. स्वत:च्या ऑफिसमध्ये एक मोठा चांगला आरसा लावावा. त्याचबरोबर माझ्यासाठी केस विंचरायला एक चांगला हेअरब्रश कायमस्वरूपी ठेवावा. बाकी तुमच्या परफ्यूम व शूज या गोष्टी मी सांभाळून घेईन.”

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – Video : आता एकच गाणं वाजणार! लाडक्या राणादाच्या नवीन रिअ‍ॅलिटी शोचं टायटल ट्रॅक प्रदर्शित…

यापुढे त्याने “अभिनेता संतोष जुवेकर व अभिजीत चव्हाण यांच्या शूटिंग दरम्यान काही अपेक्षा नाहीत. पण पॅकअपनंतरची लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो” असं गंमतीशीर कॅप्शन लिहिलं आहे. दरम्यान कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओत विजूने हातात एक मोबाइल धरला आहे. त्या मोबाईलच्या पुढच्या कॅमेऱ्यात बघून तो केस विंचरत आहे आणि त्यांचा कुणीतरी गुपचुप व्हिडीओ काढला आहे.

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत नवीन ट्विस्ट, अद्वैतचा जाणार जीव? नेत्रा वाचवू शकणार का नवऱ्याचे प्राण?

विजू व कुशल एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र कामही केलं आहे. त्यामुळे यांची मैत्री अगदी घट्ट आहे. त्याचबरोबर विजू, अभिजीत, संतोष व कुशल यांच्यातील मैत्रीचा बॉण्ड ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजमधून कायमच प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यांची मैत्री ही प्रेक्षकांना नेहमीच आवडते. दरम्यान कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.  

Tags: entertainment newskushal badrikemarathi actormarathi entertainmentMarathi newsviju mane
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "तुम्ही दोघांनी…", 'बिग बॉस'च्या घरात नवरा-बायकोमध्ये होणारी भांडणं पाहून अंकिता लोखंडेच्या सासूने सुनावलं, म्हणाली, "विचित्र पद्धतीने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.