झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादाच्या भूमिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. हार्दिक हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओ शेअर करत टो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अशातच आता त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि हा खास व्हिडीओ आहे त्याच्या आगामी ‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शो चा. येत्या ४ डिसेंबरपासून त्याचा हा नवीन रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा टायटल ट्रॅक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हार्दिक जोशीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले आहे. “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच गाणं वाजणार…आता मज्जा येणार… ‘जाऊ बाई गावात’चा गावरान टायटल ट्रॅक तुमच्या भेटीला.” असं म्हणत हा ट्रॅक प्रदर्शित करण्यात आला आहे. या शो मध्ये श्रीमंत व शहरात वाढलेल्या मुली गावकडचे आयुष्य जगू शकतात का? किंवा ते कसे जगू शकतात? याचा प्रवास ‘जाऊ बाई गावात’ या शोद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – अबब! प्राजक्ता माळीने घातला तब्बल ‘इतक्या’ किलोंचा घागरा, म्हणाली, “नीट चालता…”
या शोमधील सहा स्पर्धकांची नावे जाहीर झाली आहेत. पहिली स्पर्धक ही स्नेहा भोसले आहे. ती श्रीमंत घरातील नात असून तिला घरातील सर्वजण घाबरतात. दुसरी स्पर्धक पापा की परी संस्कृती साळुंखे आहे. तिसरी स्पर्धक रसिका ढोबळे ही फॅशन दिवा आहे. चौथ्या स्पर्धकाचं नाव हेतल पाखरे असून प्लस साइझ मॉडेल आहे. पाचवी स्पर्धक ही अत्यंत सुसंस्कारी असून तिचं नाव श्रेजा म्हात्रे आहे. तर सहावी स्पर्धक ही मोनिशा आजगावकर आहे.
आणखी वाचा – अखेर रणदीप हुड्डा व लीन लैश्राम अडकणार विवाहबंधनात, ‘या’ दिवशी चढणार बोहल्यावर, पारंपरिक पद्धतीने होणार लग्न
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर हार्दिकला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकताच तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतदेखील दिसला होता. त्यानंतर आता पुन्हा तो ‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर आगामी काळात त्याचा ‘क्लब ५२’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या आगामी शो साठी तसेच त्याच्या चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.