रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’ने घराची दुर्दशा पाहून स्पर्धकांना दिली धमकी, म्हणाले, “एका तासात घर साफ करा नाहीतर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 23, 2023 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 give ultimatum to the contestants for cleaning the house video viral on social media

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'ने घराची दुर्दशा पाहून स्पर्धकांना दिली धमकी, म्हणाले, "एका तासात घर साफ करा नाहीतर…"

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व हे घरातील स्पर्धकांच्या खेळांपेक्षा भांडणामुळेच अधिक चर्चेत राहिलं आहे. घरातील स्पर्धक हे नेहमीच एकमेकांशी वाद घालताना दिसतात. आतापर्यंत या शो मध्ये अनेक वादविवाद व भांडण प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. अशातच शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये ‘बिग बॉस’ स्पर्धकांना खुलेआम धमकावताना दिसत आहे. घरातील स्पर्धकांचा भयंकर गोंधळ पाहिल्यानंतर ‘बिग बॉस’चा पारा चढला आणि त्यांनी सर्वांना अल्टिमेटम दिला असल्याचे यात दिसत आहे. (Bigg Boss 17 New Pomo Viral)

या प्रोमोमध्ये असे दिसते की, ‘बिग बॉस’ सर्व सदस्यांना एका ठिकाणी बोलवून ‘बिग बॉस’च्या घरातील आधीची दृश्ये दाखवतात. तेव्हा घरातील सर्व वस्तु व्यवस्थित व नीटनेटक्या दिसतात. हे पाहून काही स्पर्धक खूप उत्साहित व आनंदी होतात. यावर ‘बिग बॉस’ सर्वांना “हे कसे वाटले?” असे विचारतात. मग ते घरातील सद्यस्थिती दाखवतात. तेव्हा या दृश्यात घरात पसारा, स्वयंपाकघरातील अस्वच्छता दिसत आहे. कपडे, चप्पल, शूज व सगळे सामान इकडे-तिकडे पसरलेले दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विरोधामुळे ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटात दिसणार नव्हती आलिया भट्ट, करण जोहरने केला खुलासा, म्हणाला, “आलियाच्या जागी…”

घराची सद्यस्थिती दाखवल्यानंतर, ‘बिग बॉस’ असे म्हणतात की, “बिग बॉस’चं हे घर सुरुवातीला सौंदर्यासाठी चर्चेचा विषय होता. पण आता तो घरातील अस्वच्छतेसाठी चर्चेचा विषय बनला आहे. हे पाहून मला तुमच्या आरोग्याची काळजी वाटत आहे.” यापुढे ते असे म्हणतात की, “मी तुम्हाला एक तासाचा वेळ देत आहे. या एक तासात घर स्वच्छ करा नाहीतर मला साफसफाई करावी लागेल आणि मी साफसफाई करायला लागलो तर घरातील स्पर्धकांची गर्दी कमी होईल.”

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून होणार ओरीची एन्ट्री, सलमानसह चित्रीकरणास करणार सुरुवात, नक्की ओरी आहे तरी कोण?

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या अल्टिमेटमनंतर घरातील सर्व स्पर्धक साफसफाई करायला लागतात. तसेच ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांच्या साफसफाईबद्दल नकळत दिलेल्या अल्टिमेटममुळे येत्या भागात नक्की कुणाची व कशाची साफसफाई होणार? याविषयी स्पर्धकांमध्ये तसेच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags: Big boss 17bollywood newsentertainmententertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
amruta khanvilkar birthday special post her husband

वाढदिवसानिमित्त अमृता खानविलकरला मिळाल्या नवऱ्याकडून खास शुभेच्छा; आभार मानत म्हणाली, “मागील २० वर्ष...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.