सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून होणार ओरीची एन्ट्री, सलमानसह चित्रीकरणास करणार सुरुवात, नक्की ओरी आहे तरी कोण?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 23, 2023 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Orry In Bigg Boss 17

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून होणार ओरीची एन्ट्री, सलमानसह चित्रीकरणास करणार सुरुवात, नक्की ओरी आहे तरी कोण?

बी टाऊन कलाकारांसह तसेच नीता अंबानी, ईशा अंबानी यांसारख्या कलाकारांबरोबर सोशल मीडियावर दिसणार्‍या ओरीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जान्हवी कपूर, नीसा देवगण, भूमी पेडणेकर यांसारख्या अभिनेत्रींचा जवळचा मित्र अशी ओळख असलेल्या ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ओरी लवकरच ‘बिग बॉस १७’ च्या घरात हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे. ओरी शोच्या ‘वीकेंड का वार’मध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Orry In Bigg Boss 17)

इटाइम्सच्या रिपोर्टनुसार, ओरी लवकरच वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस१७’ मध्ये प्रवेश करणार आहे. फिल्मी पार्ट्या असोत किंवा उद्योगपती, राजकारण्यांच्या पार्ट्या असोत, ओरी नक्कीच सर्व सेलिब्रिटींसह पाहायला मिळते. ओरीच्या इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर, नीसा देवगन, अनन्या पांडे, शनाया कपूर, दीपिका पादुकोण यांसारख्या अनेक अभिनेत्री त्याच्या लिस्टमध्ये आहेत.

आणखी वाचा – शुभमनबरोबरच्या फोटोंवर सारा तेंडुलकर स्पष्टचं बोलली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्या नावाने…”

ओरी त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. अशातच आता त्याच्या ‘बिग बॉस १७’ मधील प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. इटाइम्सने एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, ओरी आज शोच्या सेटवर पोहोचणार आहे. सलमानसह एंट्री सिक्वेन्स शूट करण्यासाठी तो सेटवर जाणार असल्याची चर्चा आहे. सलमान त्याची प्रेक्षक व स्पर्धकांशीही ओळख करून देणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मध्येच तो या शोमधून बाहेर पडणार की शेवटपर्यंत ‘बिग बॉस’च्या घरात राहणार याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

आणखी वाचा – “आमिर खानपासून अगदी अमिताभ बच्चनपर्यंत…”, बायकोच्या कामाचं कौतुक करत नम्रता संभेरावचा पती भावुक, म्हणाला, “…म्हणून मी तिचं कौतुक”

सोशल मीडियावर जवळपास सर्वच चित्रपट अभिनेत्री व स्टार किड्सबरोबरचा त्याचा वावर पाहून प्रेक्षक अनेकदा विचारतात, हा ओरी नक्की कोण आहे? ‘बिग बॉस’च्या घरातील एंट्रीने ओरीबद्दलचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. अलीकडेच ओरीने ‘मेन्स लॉकर रूम’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कठीण काळाबाबत भाष्य केले. याबाबत बोलताना ओरीने पूर्वी तो टेबल साफ करायचे काम करायचा. ओरीने सांगितले, “तेव्हा मी आमच्या छोट्या वेटर्स ग्रुपचा एक भाग होतो आणि मी टेबल साफ करायचो” असं म्हणत ओरीने त्याच्या सुरुवातीच्या कठीण काळाबाबत भाष्य केलं.

Tags: bigg boss 17Bigg Boss 17 wild card entryentertainmentorryOrry In Bigg Boss 17salman khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Karan Johar Reveals Varun Dhawan Sidharth Malhotra Truth

वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विरोधामुळे 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटात दिसणार नव्हती आलिया भट्ट, करण जोहरने केला खुलासा, म्हणाला, "आलियाच्या जागी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.