भारतात सध्या क्रिकेट विश्वचषकाचं वातावरण चांगलंच रंगत आलं आहे. भारतीय संघ आता अंतिम सामन्यात पोहोचला आहे. बुधवारी भारताचा न्यूझीलंड विरूद्ध धुवांधार सामना झाला. त्यात भारताने विजय संपादन करत अंतिम सामन्यात मजल मारली. या सामन्यात विराट कोहलीने ताबडतोड फलंदाजी करत त्यांच्या करिअरचं ५०वं शतक पूर्ण केलं. ‘मुंबई स्टेडियम’वर खेळला गेलेला हा सामना पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळीही उपस्थित होती. विराटच्या बायकोने म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मानेही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. विराटच्या या शतकी खेळीसाठी तिने एक खास पोस्ट लिहीत विराटचं कौतुक केलं तसेच तिने देवाचेही आभार मानले आहेत. (Anushka special post for virat on 50 century)
बुधवारी खेळला गेलेला सामना हा यावर्षीच्या विश्वचषकातील भारतासाठीचा खूप महत्त्वपूर्ण सामना होता. न्यूझीलंडने हा सामना जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण भारताने उत्तम खेळी करत हा सामना आपल्या नावावर केला. या सामन्यात विराटने आपल्या करीअरचं ५०वं शतक झळकवलं. हे शतक पूर्ण करून त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यांचं रेकॉर्डही मोडलं. विराटने शतकाचं सेलिब्रेशन हटके अंदाजात केलं. यावेळी संपूर्ण भारतीयांसह त्याची पत्नी अनुष्का शर्माचाही आनंद गगनात मावेनासा होता. विराटने हा क्षण सेलिब्रेट करताना अनुष्काला मैदानातून फ्लाईंग किसही दिली.

अनुष्का एक खास पोस्ट लिहीत विराटचं कौतुक केलं आणि देवाचे यासगळ्यासाठी आभार मानले. ती लिहीते, “देव हा एक सर्वोत्कृष्ट लेखक आहे! तुझ्या प्रेमाच्या रुपात मला आशीर्वाद देण्यासाठी, तुला सामर्थ्याकडे वाटचाल करताना पाहण्यासाठी तसेच तुझ्याकडे जे काही आहे आणि जे काही पुढे असेल ते साध्य करण्यासाठी, आणि तू स्वतःशी, खेळाशी प्रामाणिक राहण्यासाठी मी त्याचे खूप आभार मानते. तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस”, असं लिहीत तिने विराटचा एक फोटो शेअर केला. ज्यात तो वर बघत आभार व्यक्त करताना दिसत आहे.
विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०वं शतक झळकवून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने शतक ठोकल्यानंतर त्याने सचिनसमोर नतमस्तक होऊन मैदानातच त्याला नमस्कार केला. सचिनने विराटच्या शतकाबद्दल पोस्ट लिहीत अभिनंदनही केलं आहे. विराटची आजवरची ही खेळीच त्याला भारतातील सध्याचा एक सर्वोत्तम फलंदाज बनवते. संपूर्ण भारतातून त्यांच्या या खेळीचं कौतुक होत आहे.