मराठी अभिनेत्री सुरभी भावे ही तिच्या बिनधास्त अंदाजासाठी व स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ती या सृष्टीत सक्रिय असून नाटक, मालिका व चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ‘तुला पाहते रे’, ‘स्वामिनी’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘भाग्य दिले तु मला’, ‘३६ गुणी जोडी’ यांसारख्या अनेक मालिका, तसेच ‘पावनखिंड’ व ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांमध्ये सुरभीने काम केलेलं आहे. ती सध्या सोनी मराठीवरील ‘राणी मी होणार’ मालिकेत महत्त्वाचं पात्र साकारत आहे. सुरभी सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून तिचं स्वतःचं युट्युब चॅनेल आहे. ज्यामध्ये ती तिच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से चाहत्यांसह शेअर करते. (Surabhi Bhave talks about her first miscarriage)
‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमाला नुकतीच सुरभीने हजेरी लावली होती. यावेळी तिने विविध प्रश्नांच्या उत्तरांना स्पष्ट उत्तरे देत खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. या मुलाखतीत सुरभीने दोन वेळा मिसकॅरेज झाल्याचा खुलासा केला आहे. त्याबद्दल मनमोकळेपणे बोलताना ती म्हणाली, “पहिल्यांदा मला जेव्हा हा त्रास झाला, तेव्हा मी एक मालिका करत होती. म्हणजे माझी मुलगी सान्वीच्या जन्माआधी आणि तिच्या जन्मानंतर असे दोन गर्भपात झाले. तर मला मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा गरोदर होते, तेव्हा मला उच्च मधुमेहाचा त्रास झाला. त्यावेळेस मला डॉक्टरांनी हे बाळ न जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. कारण माझ्या रक्तातील साखरेची पातळी ४०० पर्यंत वाढली होती, आणि होणाऱ्या बाळाला हृदयाचे ठोकेच नव्हते.”
“हे सगळं ऐकताना मी त्यावेळेस इतकी भावुक झाले की, पहिल्यांदाच आपण आई होणार आणि हे असं कसं. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, निसर्ग सिग्नल देत असतो. ते तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. काहीतरी अशी घटना घडेल की, मानसिकरीत्या सदोष बाळ तुम्ही जन्माला घालणार का? या पद्धतीने ते मला विचारत होते. डॉक्टरांची ती गोष्ट ऐकताना मला इतकं वाईट वाटलं की, मला त्यावेळेस काहीच सुचेनासं झालं होतं.”, असं ती यावेळी म्हणाली.
हे देखील वाचा – “पंखा साफ करायची वेळ…”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिलं तोडीस तोड उत्तर, म्हणाला, “कधी…”
पुढे ती म्हणते, “माझी स्वामी समर्थ महाराजांवर प्रचंड श्रद्धा असून जेव्हा मी त्यांच्याशी बोलते, तेव्हा त्यांना स्वामी आबा म्हणते. तर हे सगळं कळल्यानंतर मी लगेच स्वामींकडे गेले आणि त्यांना म्हणाले हे जे डॉक्टर्स सिग्नल सिग्नल म्हणतात, ते मला समजण्याची बुद्धी दे. त्याच्यानंतर १०व्या मिनिटांनी मला रक्तस्रावचा त्रास सुरु झाला. आणि तेव्हाच मला कळालं की तू हे मूल जन्माला घालू नकोस, ते तुझ्यासाठी धोकादायक आहे. पुढे त्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मला तीन वर्ष याची भयंकर भीती वाटत होती. त्यानंतर लेक सान्वीचा जन्म झाला. पण, ती एक जी भीती असते तीच आता जर परत घडली. तर मी भावनिकदृष्ट्या खूप खंबीर आहे, हे मला त्यावेळेला कळालं. त्या घटनेचा माझ्या आईला आणि नवऱ्याला मोठा धक्का बसला. तेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं.”
हे देखील वाचा – चुकीच्या पद्धतीने मला हात लावला अन्…; सुरभी भावेने सांगितला मन सुन्न करणारा अनुभव, म्हणाली, “तो रोज येऊन…”
“तीन वर्षांनंतर पुढे जेव्हा मला सान्वीची गुडन्यूज कळाली, तेव्हा त्या गरोदरपणा काळातील चार आठवड्यांपासून ते तिच्या जन्मानंतरच्या चार महिन्यांपर्यंत मी रोज चार इंजेक्शन घेत होती. त्यावेळेस असं असतं की, काहीही झालं तरी बाळ महत्त्वाचं असतं. त्यामुळे जेव्हा तिचा जन्म होणार होता, तेव्हा मी डॉक्टरला पहिला प्रश्न केला होता की, बाळाला मधुमेहाचा त्रास आहे. त्यावर ते नाही म्हणाले. आणि तो माझ्यासाठी एक सर्वोच्च आनंद होता जो आपल्याला बाळाला हातात घेल्यानंतर असतोच, पण त्याहीपेक्षा मला जास्त डॉक्टरांनी ही बाब सांगितल्याचा मोठा आनंद झाला होता.”, असं सुरभी यावेळी म्हणाली.