बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘टायगर ३’ मुळे बराच चर्चेत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाची वेगळीच हवा पाहायला मिळत आहे. यशराज फिल्मचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यावर्षीच्या सूपरहिट ‘पठान’, ‘जवान’ तसेच ‘गदर २’ चित्रपटांचे रेकॉर्ड तोडायला सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात सलमान व कतरिनाचा हटके अंदाज पाहायला मिळाला. कतरिनाचा हटके अॅक्शन लूक सगळ्यांचेच लक्षवेधून घेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत आणखीनच उत्सुकता वाढली आहे. (Krk tweets about salman and aamir)
सोशल मीडियावरही सध्या या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. काहीजण सकारात्मक तर काहीजण टीका करताना दिसत आहे. यात आणखी एका बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेता व समीक्षकानेही नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणजे कमाल आर खान उर्फ केआरके. त्याने चित्रपटाबाबत सोशल मीडियावर नकारात्मक ट्वीट केलं आहे. ‘टायगर ३’ च्या टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याने चित्रपटावर बरीच टीका केली होती. आताही त्याने सलमानला उद्देशून नकारात्मक ट्वीट केलं आहे.‘टायगर ३’ चा टिझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट केआरकेच्या निशाण्यावर आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये सलमानला म्हातारा म्हणून हिणवलं होतं. आताही त्याने पुन्हा सलमानसह अभिनेता आमिर खानवरही निशाणा साधला आहे.
I don’t believe that Budhaoo can defeat Batla. If Batla is flop then Budhaoo will be super flop. #TigerBuddhaHai will become a disaster because the brand KRK says so.
— KRK (@kamaalrkhan) November 8, 2023
केआरकेने ट्विटमध्ये लिहिलं की, “म्हातारा भाईजान बुटक्याला मागे टाकू शकेल असं मला अजिबात वाटत नाही. जर बुटका फ्लॉप ठरला आहे तर म्हातारादेखील सुपरफ्लॉप ठरेल. #TigerBuddhaHai हा त्याचा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटणार आहे. कारण केआरकेने याची भविष्यवाणी केली आहे”, असं लिहीत त्याने सलमानसह अभिनेता आमिर खानची देखील खिल्ली उडवली आहे. या ट्विटवरून सोशल मीडियावर बऱ्याच नेटकऱ्यांनी केआरकेला सुनावलं आहे. तर सलमानच्या चाहत्यांनी सलमानची बाजू घेत केआरकेवर टीका केली आहे.
‘टायगर ३’ हा चित्रपट आता १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांनंतर आता या चित्रपटातही सलमान व कतरिना पुन्हा अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सलमान कतरिनासह इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.