बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचं नाव घेतलं जातं. त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण निर्माण केलं आहे. ‘हड्डी’ वेब सीरिजमधील त्यांचा हटके अंदाज सगळ्यांनाच आवडला. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याने आपली जागा निर्माण केली आहे. त्याचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने बऱ्याच कठीण काळाचा सामना करावा लागला. यासाठी त्याने गार्डच्या नोकरीपासून ते उपाशी राहण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी सहन केल्या. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करियरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितलं ज्यावेळी त्याच्या त्वचेच्या रंगामुळे त्याने स्वतःचा आत्मविश्वास गमावला होता. (Nawazuddin Siddiqui used to apply fairness cream)
नवाजुद्दीनने नुकतंच ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या एक मुलाखतीत त्याने सांगितलं की, “बरीच वर्षे मी एक चांगला दिसणारा व्यक्ती नव्हता असं मला वाटायचं. बऱ्याच वर्षांनंतर याकडे बघण्याचा माझा विचार बदलला आणि त्यानंतर मी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला”. यावेळी नवाजुद्दीनने सांगितलं की, त्याने फेयरनेस क्रीम्सच्या जाळ्यातही अडकला होता. याबद्दल सांगताना नसिरुद्दीन म्हणाला, “करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात मला माझ्या त्वचेच्या रंगामुळे बरंच असुरक्षित वाटतं होतं. मी बऱ्याच प्रकारच्या क्रीम लावल्या होत्या पण त्याचा काहीही परिणाम मला दिसून आला नव्हता”.
नवाजुद्दीनने पुढे सांगितलं, “त्यानंतर मला कळलं की, मी असाच आहे आणि माझा रंगही असाच आहे. मला वर्षानुवर्ष असं वाटत होतं की मी एक चांगला दिसणार व्यक्ती नाही. बऱ्याच वेळानंतर मला कळून चुकलं की माझा चेहरा ठीक आहे”, असं सांगत त्याने स्वतःच्या त्वचेच्या रंगाबाबत असलेला गैरसमज स्पष्ट केला.
नवाजुद्दीने पुढे सांगतो, “प्रत्येकाला आपला स्वतःच्या लूकबाबत आत्मविश्वास असला पाहिजे. ही जी कमीपणाची भावना आहे ती दुसऱ्या कारणांमुळेही येत असते”. नवाजुद्दीनने सांगितलं की कलाकार म्हणून त्याला सिद्ध करण्यासाठी १०-१२ वर्षे लागली. त्यानंतर हळूहळू लोकांनी त्याला स्वीकारायला सुरुवात केली.