शुक्रवार, मार्च 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“म्हातारा भाईजान बुटक्याला…”, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सलमान व आमिर खानची उडवली खिल्ली, म्हणाला, “सुपरफ्लॉप…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 8, 2023 | 4:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Krk tweets about salman and aamir

Krk tweets about salman and aamir

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘टायगर ३’ मुळे बराच चर्चेत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाची वेगळीच हवा पाहायला मिळत आहे. यशराज फिल्मचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यावर्षीच्या सूपरहिट ‘पठान’, ‘जवान’ तसेच ‘गदर २’ चित्रपटांचे रेकॉर्ड तोडायला सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात सलमान व कतरिनाचा हटके अंदाज पाहायला मिळाला. कतरिनाचा हटके अ‍ॅक्शन लूक सगळ्यांचेच लक्षवेधून घेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत आणखीनच उत्सुकता वाढली आहे. (Krk tweets about salman and aamir)

सोशल मीडियावरही सध्या या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. काहीजण सकारात्मक तर काहीजण टीका करताना दिसत आहे. यात आणखी एका बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेता व समीक्षकानेही नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणजे कमाल आर खान उर्फ केआरके. त्याने चित्रपटाबाबत सोशल मीडियावर नकारात्मक ट्वीट केलं आहे. ‘टायगर ३’ च्या टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याने चित्रपटावर बरीच टीका केली होती. आताही त्याने सलमानला उद्देशून नकारात्मक ट्वीट केलं आहे.‘टायगर ३’ चा टिझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट केआरकेच्या निशाण्यावर आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये सलमानला म्हातारा म्हणून हिणवलं होतं. आताही त्याने पुन्हा सलमानसह अभिनेता आमिर खानवरही निशाणा साधला आहे.

I don’t believe that Budhaoo can defeat Batla. If Batla is flop then Budhaoo will be super flop. #TigerBuddhaHai will become a disaster because the brand KRK says so.

— KRK (@kamaalrkhan) November 8, 2023

आणखी वाचा – “कमीपणाची भावना…”, गोरं होण्यासाठी सतत फेअरनेस क्रीम वापरायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “माझा चेहरा…”

केआरकेने ट्विटमध्ये लिहिलं की, “म्हातारा भाईजान बुटक्याला मागे टाकू शकेल असं मला अजिबात वाटत नाही. जर बुटका फ्लॉप ठरला आहे तर म्हातारादेखील सुपरफ्लॉप ठरेल. #TigerBuddhaHai हा त्याचा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटणार आहे. कारण केआरकेने याची भविष्यवाणी केली आहे”, असं लिहीत त्याने सलमानसह अभिनेता आमिर खानची देखील खिल्ली उडवली आहे. या ट्विटवरून सोशल मीडियावर बऱ्याच नेटकऱ्यांनी केआरकेला सुनावलं आहे. तर सलमानच्या चाहत्यांनी सलमानची बाजू घेत केआरकेवर टीका केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा – मलायका अरोराच्या मांडीवरच्या काळ्या डागाचं कारण काय?, चर्चा रंगल्यानंतर म्हणाली, “मी खूप वाईट…”

‘टायगर ३’ हा चित्रपट आता १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांनंतर आता या चित्रपटातही सलमान व कतरिना पुन्हा अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सलमान कतरिनासह इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

Tags: aamir khankamaal r khansalman khanupcoming tiger 3
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam
Entertainment

प्रसिद्ध अभिनेत्रीची बिल्डरकडून मोठी फसवणूक, ४७ लाखांचा गंडा, नेमकं प्रकरण काय?

मार्च 5, 2026 | 5:17 pm
Anurag Doval UK07 Rider crying in YouTube video
Entertainment

आई-वडिलांकडून छळ, भावाने सगळंच हडपलं अन्…; ‘बिग बॉस १७’ फेम स्पर्धकाची वाईट अवस्था, म्हणाला, “आत्महत्या…”

मार्च 5, 2026 | 12:43 pm
Mugdha Vaishampayan Puranpoli Video
Entertainment

Video : सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुग्धा वैशंपायनने बनवल्या पुरणपोळ्या, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

मार्च 5, 2026 | 11:59 am
Rashmika Mandanna Red Saree
Entertainment

लाल रेशमी साडी, पांढरा रेशमी कुर्ता आणि…; हैदराबाद रिसेप्शनमधील रश्मिका-विजयच्या लूकने वेधलं लक्ष, साऊथ इंडियन लूकमध्ये दिसले

मार्च 5, 2026 | 10:43 am
Next Post
swati deval share a post for her son birthday

"बाबा रिक्षा पळव म्हणाला अन्…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला लेकाच्या जन्मावेळीचा प्रसंग, म्हणाली, "स्वामी नक्कीच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.