बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींच्या यादीतील एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे मलायका अरोरा. वयाच्या ४८ व्या वर्षीदेखील मलायका खूप फिट आहे. झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यातही तिने हजेरी लावली होती. मलायका बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मात्र सध्या ती चर्चेत असण्याचं कारण काही वेगळंच आहे. काही दिवसांपूर्वी मलायका जीमच्या बाहेर स्पॉट झाली होती. यावेळी मलायकाच्या मांडीवर एक मोठी काळी खूण दिसली. ज्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर बरारच व्हायरल होत होता. त्यानंतर तिच्या पायाला असलेल्या खूणेबाबत आणि ती खूण लपवण्यासाठी त्या पद्धतीचे कपडे का घातले नाही अशी विचारणाही करण्यात आली होती. याबाबत मलायकाने खुलासा केला. (Malaika arora speaks on her injury mark)
मलायका नेहमी कॅमेरासमोर येते तेव्हा ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बऱ्याचदा तिला विविध ठिकाणांवरून स्पोट केलं जातं. विशेष म्हणजे वर्कआऊटसाठी जाताना ती बऱ्याच वेळी दिसते. नुकताच तिचा वर्कआऊटला जातानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात जिममध्ये जाणाऱ्या मलायकाच्या मांडीवर एक मोठा काळा डाग होता. याबाबत तिला विचारल्यावर तिने दुखापतीबाबत खुलेपणाने वक्तव्य केलं.
‘बॉम्बे टाइम्स फॅशन’ आठवड्यादरम्यान बोलताना मलायकाने त्या खुणेबाबत सांगितलं. मलायका म्हणाली, “मी खूप वाईट पद्धतीने पडले. यात लपवण्यासारखं काय आहे? ही दुखापत अजून वाढेल असे कपडे मी सध्या परिधान करू शकत नव्हते. तसंच मला ही जखम उघडी ठेवणं गरजेचं होतं. लोक पडतात, तसंच आपणही स्वतःला दुखावतो मग पुन्हा स्वतःला सांभाळतो आणि पुढे जातो. काही जखमा स्वतःची खूण मागे सोडतात आणि काही सोडत नाहीत पण हेच आयुष्य आहे”.
मलायकाने नुकताच तिचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी मलायका तिच्या गर्ल्स गँगबरोबर दुबईला पोहोचली होती. तिने या क्षणांचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले होते. तिथे तिने स्काय डायव्हिंगचाही आनंद लुटला. आकाशातून उंचावरून उडी मारतानाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.