मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान मिळवलं. त्यांच्या अभिनयासह त्यांचं देखणं व्यक्तिमत्त्व सगळ्यांनाच भावतं. त्यांनी आजवर बऱ्याच चित्रपटात काम केली आहे. मराठीच नाही तर बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत काम केलं आहे. अजिंक्य सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. कामासह इतर व्हिडीओ ते इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी प्रवास करतानाचा रस्त्यावर पाहिलेला मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Ajinkya deo share a comedy video during traveling)
अजिंक्य यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ हा चारचाकी गाडीतून चित्रीत केला दिसत आहे. त्यात एका दोन चाकी गाडीवर ड्रायव्हरसह चार जण बसलेले आहेत. ते ज्या प्रकारे बसले आहेत ते खरंच खूप हास्यास्पद आहे. पुढे बसलेला ड्रायव्हर अगदी टोकावर बसला असून मध्ये दोन वयस्कर व्यक्ती बसले आहेत. तर सगळ्यात मागे एक तरुण बसला आहे जो स्वतःचे पाय मागे उलटे दुमडून विचित्र प्रकारे बसलेला दिसत आहेत. या व्हिडीओला अजिंक्य कॅप्शन देतात, ‘ही मैत्री आम्ही कधीच नाही तोडणार, गाडी ठोकणार पण साथ कधी नाही सोडणार’, असं लिहीत त्यांनी विनोदी अंदाजात हा प्रकार सोशल मीडियावर मांडला आहे.
या व्हिडीओतून त्यांना आपण वाहतुकीचे नियम किती छान प्रकारे पाळतो हे विनोदी स्वरूपात सांगितलं आहे. बऱ्याचदा कलाकार प्रवास करत असताना त्यांना प्रवासात दिसलेल्या ‘नावाच्या प्लेट्स’ शेअर करताना दिसतात. त्यांच्या या मागचा उद्देश वाहतुकीचे नियम पाळणं आणि आपल्या समाजात याविषयीची सतर्कता निर्माण करण्याच्या अनुषंगाने असतात. तसंच आज अजिंक्य यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा त्याच लोकांसाठी आहे जे लोक अशाच प्रकारे प्रवास करतात. एक गाडीवर २ माणसं असणं अपेक्षित आहे पण या व्हिडीओत तर तब्बल चार माणसांनी प्रवास केला जात आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडीओवर लाईक व कमेंट करताना दिसत आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर एका नेटकऱ्याने, ‘फार मजा मजा येतेय अशा रोड राईडची’, असं लिहीत मजेशीर अंदाजात कमेंट केली आहे.