सध्या अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ते त्यांचे फोटोज व व्हिडीओज अनेकदा शेअर करत राहतात. जशी त्यांच्या फोटोजची जोरदार चर्चा होते, तसंच त्यांच्या काही काही फोटोंमुळे त्यांना बरंच ट्रोल व्हावं लागलं. सध्या अनेक मराठी अभिनेत्रींना बिकिनी परिधान केल्यामुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. असाच अनुभव प्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकरलाही आला आहे. मिताली अभिनयाबरोबरच तिच्या गुड लूकिंगसाठी ओळखली जाते. तिच्या फोटोशूट्सची सतत चर्चा होत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिला बिकिनी परिधान करण्यावरून बरंच ट्रोल केलं जात आहे. असं असलं तरी, तिने अनेकदा व्हिडीओ व कमेंट्समधून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत आलेली आहे. (Mitali Mayekar answerwed to Trollers)
मिताली गेल्या अनेक दिवसांपासून विदेश दौरा करत आहे. तिने तिच्या विदेश दौऱ्यातील फोटोशूट्स व व्हिडीओज इंस्टाग्रामवर शेअर केले. ज्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. पण काही नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलं होतं. त्यावर ती अनेकदा उत्तर देत आलेली. नुकतीच ती तिच्या मैत्रिणींसह इंडोनेशियाला गेली होती. त्यावेळी तिने पिंक बीचवर एक फोटोशूट केला होता. त्या फोटोशूटमधील एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्याला तिने “सूर्यप्रकाश आणि थोडासा गुलाबी रंग असेल, तर सर्व काही शक्य आहे.”, असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – “मी पैसे कमवण्यासाठी…”, ‘बिग बॉस’ स्पर्धक रिंकू धवनचा पूर्वाश्रमीचा पती किरण करमरकरचा मोठा खुलासा, म्हणाले, “तिने मला फोन केला आणि…”
मात्र, त्या फोटोवर एका ट्रोलरने विचित्र कमेंट केली. जे पाहून मिताली संतापली आणि त्याच भाषेत त्याला सडेतोड उत्तर दिलं. एका ट्रोलरने “नग्न झालं तर चित्रपटात काम मिळतं का?” अशी विचित्र कमेंट केली. त्यावर मितालीने “माहिती नाही बुवा! प्रयत्न करून बघा.”, असा रिप्लाय दिला. तिच्या या उत्तरावर चाहत्यांनी पसंती दर्शवत तिचे कौतुक केले.
हे देखील वाचा – एकमेकांना किस केलं, निवांत क्षण अन्…; वनिता खरातने नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, म्हणाला, “तू मला…”

ही मितालीची पहिलीच वेळ नसून याआधीही तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत आलेली आहे. काही दिवसांपूर्वी तिला काही नेटकऱ्यांनी “हिच का मराठी संस्कृती” म्हणत जोरदार ट्रोल केलं होतं. त्यावर तिने साडी परिधान करतानाचा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना चांगलेच सुनावले होते. आताही तिने ट्रोलर्सना कमेंटद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलं असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होताना दिसते.