शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी पैसे कमवण्यासाठी…”, ‘बिग बॉस’ स्पर्धक रिंकू धवनचा पूर्वाश्रमीचा पती किरण करमरकरचा मोठा खुलासा, म्हणाले, “तिने मला फोन केला आणि…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 1, 2023 | 9:40 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Kiran Karmarkar talks about Bigg Boss 17

"मी पैसे कमवण्यासाठी…", 'बिग बॉस' स्पर्धक रिंकू धवनचा पूर्वाश्रमीचा पती किरण करमरकरचा मोठा खुलासा, म्हणाले, "तिने मला फोन केला आणि…"

हिंदी टीव्ही जगतातील लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त टीव्ही शो ‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे, नील भट्ट, मन्नारा चोप्रा यांसारख्या कलाकारांसह अनेक प्रसिद्ध युट्युबरही सहभागी झालेले आहे. याच घरात नकारात्मक व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध असलेली टीव्ही अभिनेत्री रिंकू धवन देखील सहभागी झाली. दरम्यान, अभिनेत्रीचे पुर्वश्रमीचे पती व मराठमोळे अभिनेते किरण करमरकर हेही या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा मध्यांतरी सुरु होत्या. मात्र, त्या अफवा असल्याचे सांगत त्यांनी एक खुलासा केला आहे. (Kiran Karmarkar talks about Bigg Boss 17)

अभिनेत्री रिंकू धवनने किरण करमरकर यांच्याशी लग्न केलं होतं. दोघांचा हा संसार गेली १५ वर्ष गुण्यागोविंदाने सुरु होता. मात्र, काही काळानंतर हे दोघे विभक्त झाले. या जोडीला एक मुलगा आहे. अशातच किरण यांनी नुकतंच ‘ई टाईम्स’ला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी ‘बिग बॉस’ बद्दल बोलताना त्यांच्या पूर्व पत्नीबद्दल एक खुलासा केला आहे.

हे देखील वाचा – एकमेकांना किस केलं, निवांत क्षण अन्…; वनिता खरातने नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, म्हणाला, “तू मला…”

View this post on Instagram

A post shared by Kiran Karmarkar (@karmarkar_kiran)

‘बिग बॉस’ कडून आलेल्या ऑफरबद्दल आणि पूर्वपत्नी रिंकूच्या सहभागाबद्दल बोलताना किरण करमरकर म्हणाले, “या चर्चा पूर्णपणे निष्प्रभ असून मला अशी कोणतीही ऑफर आलेली नाही. मी कधीही या शोचा भाग बनणार नाही. हा शो पाहिला नाही. मात्र, यावर होणाऱ्या चर्चांबद्दल मी खूप काही ऐकलं आहे. जेव्हा रिंकूने या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्याआधी तिने मला फोन केला. आम्ही दोघं एका बिल्डिंगमध्ये राहत असून आमच्या मुलाचं दोन्ही घरात येणं-जाणं सुरूच असतं. म्हणून ती मला कळवायची की, मी थोड्या दिवसासाठी दूर राहणार आहे. तेव्हा मी तिला शुभेच्छा दिल्या. माझा मुलगा त्याच्या आवडी-निवडी जोपासत असून त्यालाही त्या घरात काय सुरु आहे, याची फारशी माहिती नाही.”

हे देखील वाचा – Video : पार्टी सोडून रस्त्यालगतच्या दुकानामध्ये पाणीपुरी खायला आल्या धनश्री काडगावकर व दीपा परब, पाहा काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

पुढे या शोबद्दल बोलताना ते म्हणाले, “अनेक महिने घरात राहून लोकांशी भांडण्यापेक्षा मी वेगळ्या पद्धतीने पैसे कमावू शकतो. मी या शोचे काही सीझन पहिले आणि या शोमध्ये माझा गेम कसा खेळायचा, हे मला ठाऊक आहे. पण मला माहित नाही की, ते कोणत्या गेमबद्दल बोलत आहे? मला या शोचा फॉरमॅट माहित नाही. मी एक साधा माणूस असून मला केवळ लोकांचे मनोरंजन करणे हेच माहित आहे. मी पैसे कमवण्यासाठी एखादा स्टॉल सुरु करेन. पण घरात बंद करून लोकांना ओरडण्यास सांगायचं असेल, तर ते मला जमणार नाही.”, असं म्हणत त्यांनी रिंकू धवनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: bigg boss 17kiran karmarkarKiran Karmarkar talks about Bigg Boss 17Rinku Dhawan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Mitali Mayekar answerwed to Trollers

"नग्न झालं तर चित्रपटात काम मिळतं?", मिताली मयेकरच्या 'त्या' फोटोवर कमेंट, अभिनेत्री म्हणते, "प्रयत्न करून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.