बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एकमेकांना किस केलं, निवांत क्षण अन्…; वनिता खरातने नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, म्हणाला, “तू मला…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 1, 2023 | 3:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vanita Kharat surprised her husband on his birthday

एकमेकांना किस केलं, निवांत क्षण अन्...; वनिता खरातने नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, म्हणाला, “तू मला...”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मनमुराद हसवत आलेला आहे. तुफान विनोदी स्किट्स व कलाकारांचे अफलातून अभिनय यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा जवळचा बनला आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांची एक फॅन फॉलोविंग निर्माण झाली आहे. याच कार्यक्रमातून ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणजे अभिनेत्री वनिता खरात ही प्रेक्षकांच्या आवडता चेहरा बनली आहे. वनिताने यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सुमित लोंढेशी विवाह केला होता. त्यानंतर हे दोघे अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या लग्नासह अनेक रोमँटिक फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. असाच एक रोमँटिक फोटो नुकतंच सुमितने शेअर केला, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (Vanita Kharat surprised her husband on his birthday)

काही दिवसांपूर्वी वनिताचा पती सुमितचा मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा झाला. त्याची पोस्टही तिने शेअर केली होती. एका रिसॉर्टमध्ये या दोघांनी तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला होता. ज्यामध्ये हे दोघे खूपच सुंदर दिसतात. आता वनिताने तिच्या पतीसाठी एक सरप्राइज दिलं असून त्याची माहिती सुमितने इंस्टाग्रामवर फोटोज शेअर करत दिली. शेअर केलेल्या या फोटोजमध्ये वनिता आणि सुमित एकमेकांना किस करताना दिसले. तसेच ही जोडी निवांत क्षण घालवताना दिसत आहे.

हे देखील वाचा – Video : पार्टी सोडून रस्त्यालगतच्या दुकानामध्ये पाणीपुरी खायला आल्या धनश्री काडगावकर व दीपा परब, पाहा काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sumit Londhe (@sumit_ashok_londhe)

सुमित या पोस्टमध्ये म्हणाला की, “यावर्षी वाढदिवसाची भेट म्हणून मला दिलेल्या सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय सरप्राइजसाठी तुझे खूप खूप धन्यवाद वनिता. पुन्हा एकदा, हा वाढदिवस सर्वात मौल्यवान आठवणींपैकी एक राहील. तसंच हा वाढदिवस कायम माझ्या लक्षात राहील. तू दिलेलं हे सरप्राइज मला प्रचंड आवडलं.”. तसेच, सुमितने या स्पेशल सरप्राइजचा एक व्लॉग लवकरच येणार असल्याचं म्हटलं आहे.

हे देखील वाचा – पेढा की बर्फी?, ‘झी मराठी’च्या मंचावर अप्पीच्या डोहाळे जेवणाचा थाट, पाहा खास फोटो

वनिता-सुमितच्या या फोटोजवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तर चाहत्यांनी देखील त्यांच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, वनिता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात काम करते. शिवाय, तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर सुमितची डिजिटल सेवा पुरवणारी कंपनी आहे. दोघांचं एक युट्युब चॅनेलदेखील असून ते यावर अनेक व्हिडीओज पोस्ट करतात.

Tags: instagram photosumit londhevanita kharatVanita Kharat surprised her husband on his birthday
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Kiran Karmarkar talks about Bigg Boss 17

"मी पैसे कमवण्यासाठी…", 'बिग बॉस' स्पर्धक रिंकू धवनचा पूर्वाश्रमीचा पती किरण करमरकरचा मोठा खुलासा, म्हणाले, "तिने मला फोन केला आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.