शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोल्हापुरमध्ये बंगला घेतला, फार्महाऊस तयार केलं अन्…; भरत जाधव यांनी कायमची सोडली मुंबई, म्हणाले, “वडिलांची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 31, 2023 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bharat Jadhav On Kolhapur House

कोल्हापुरमध्ये बंगला घेतला, फार्महाऊस तयार केलं अन्…; भरत जाधव यांनी कायमची सोडली मुंबई, म्हणाले, "वडिलांची…"

नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वातील विविध माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. त्याच्या ‘सही रे सही’ या नाटकाने तर रंगभूमी विशेष गाजवली. भरत जाधव आणि विनोद हे एक वेगळं समीकरणचं म्हणावं लागेल. मुबंईत लहानाचं मोठं झालेल्या भरतने मुंबईतील राहणीमानातील साधेपणा वैयक्तिक आयुष्यातही कायम जपला. पण भरतने या मुंबापुरीला अखेरचा रामराम केला आहे. (Bharat Jadhav On Kolhapur House)

मुंबई कायमची सोडून भरत जाधवने आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो कुटुंबासह त्याच्या गावी कोल्हापूरला राहत आहे. लवकरच भरत जाधव यांचं ‘अस्तित्व’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान त्यांनी त्यांच्या कोल्हापुरातील घराविषयी ही भाष्य केलं. कोल्हापूर येथे घर का घेतलं आणि तिथे तो का स्थायिक झाला, याचा खुलासा भरतने या मुलाखतीदरम्यान केला आहे.

आणखी वाचा – “आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही”, शेफाली शाहचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “अत्यंत वाईट वागणूक…

यावेळी बोलताना भरत म्हणाला, “माझ्या आई-वडिलांची इच्छा होती आपलं गाव कोल्हापूर आहे तर गावात एक घर किंवा फ्लॅट काहीतरी असावं. कोल्हापूरात आम्ही नेहमी पाहुण्यांकडे उतरायचो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनी मला कोल्हापूरात फ्लॅट किंवा घर बघ, असं सांगितलं. मी बंगला घेतला. अगदी फिल्मी पद्धतीने मी सुरुवातीला माझ्या भावांना बंगला दाखवला पण आई-बाबांना दाखवला नाही. मी बंगल्याचे व्यवहार केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला विमानाने घेऊन कोल्हापूरला गेलो. आमच्या घरात कोणाला विमानाचा प्रवास माहित नव्हता. मी कामानिमित्त काय ते विमान पाहिलं होत. पण घरात कोणालाच विमान प्रवास माहित नव्हता. म्हणून मुंबईहून विमानाने गेलो, त्यानंतर आमची शूटिंगची बस केली आणि थेट बंगल्यासमोर ती बस लावली. आणि सांगितलं हा आपला बंगला. तेव्हा वडिलांनी बंगला बघितला. त्यांची इच्छा होती की, तिथे पाहिजे कोणीतरी म्हणून मी आत्ता कोल्हापूरात राहतोय.”

आणखी वाचा – “आता नाही तर कधीच नाही…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेचा मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा, म्हणाली, “आत्महत्या…”

यापुढे आई वडिलांच्या इच्छेबद्दल बोलताना भरत म्हणाला, “त्यानंतर त्यांची इच्छा होती की, जवळपास शेत बघ. तर मी विचारायचो तुम्ही करणार आहात का शेती? तर ते म्हणायचे, नाही रे, पाहुण्यात बोलायला बरं पडतं की आमचं शेत आहे. म्हणून मग मी ते शेत घेतलं. लॉकडाऊन मध्ये मी आणि माझा बायकोने त्या शेतातील रान उपटून त्या चार एकरच्या जमिनीत २०० आंब्याची कलमं, १०० नारळाची झाड लावली. त्या फार्महाऊसमध्ये मी नंतर राधा कृष्णाचं देऊळ बांधलं. आणि आई वडिलांचं स्मारक बांधलं.”

Tags: astitvabharat jadhavBharat Jadhav On Kolhapur Houseentertainmentmarathi actormarathi dramamarathi filmsahi re sahi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dunki movie Teaser updates

'जवान'प्रमाणे शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपटाचा टीझर दोन भागात येणार, 'या' दिवशी प्रदर्शित होणार, मोठी माहिती समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.