बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी यंदाचं वर्ष हे विशेष ठरलं. २०१९ मध्ये ‘झीरो’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळाल्यानंतर काही काळासाठी त्याने अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘पठान’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले. पुढे ‘जवान’ चित्रपटातही तो दिसला. विशेष म्हणजे, या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून अधिकची कमाई केली होती. आता चाहते त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाची वाट पाहत असताना या चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. (Dunki movie Teaser updates)
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटात शाहरुख खान महत्वाची भूमिका साकारणार आहे. याबाबत निर्माते चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. शाहरुखच्या आगामी चित्रपटाचा टीझर हा दोन भागात विभागला जाणार आहे. प्रिव्ह्यूच्या स्वरूपात या चित्रपटाचे दोन छोटे टीझर येणार आहे. असा प्रयोग याआधी ॲटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाच्या वेळेस प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता, ज्याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता.
हे देखील वाचा – कोल्हापुरमध्ये बंगला घेतला, फार्महाऊस तयार केलं अन्…; भरत जाधव यांनी कायमची सोडली मुंबई, म्हणाले, “वडिलांची…”
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ‘डंकी’ चित्रपटाचा पहिला प्रिव्ह्यू ५८ सेकंदाचा असणार आहे. ज्यामध्ये तो अभिनेत्याच्या भूमिकेची ओळख करून देणार. तर दुसरा प्रिव्ह्यू हा १ मिनिट ४९ सेकंदाचा असणार, ज्यात चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा केला जाणार आहे. या दोनही प्रिव्ह्यूमध्ये शाहरुखची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर, चित्रपटाच्या पहिल्या टीझरची रिलीज डेट देखील समोर आली असून अभिनेत्याच्या वाढदिवशीच हा टीझर त्याच्या चाहत्यांसमोर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा – वयाची ६५शी ओलांडल्यानंतर अनिल कपूर यांनी स्वतःमध्ये केले आहेत इतके बदल, संपूर्ण लूकच बदलला कारण…
चित्रपटाच्या टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाली असून लवकरच हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखचा होम प्रॉडक्शन ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. ज्यात त्याच्यासह अभिनेत्री तापसी पन्नू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या ख्रिस्मसमध्ये हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.