बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल काही दिवसांपूर्वी एका जुन्या प्रकरणामुळे चर्चेत आले. २०१८ साली घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कोर्टाने त्यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या कालावधीत विविध भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. मात्र त्यांना खलनायक म्हणून सर्वात जास्त ओळख मिळाली. दरम्यान, काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांनी दलीप यांच्या कानशिलात लगावली, अशी अफवा पसरली होती. आता या अफवांवर दलीप यांनी एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. (Dalip Tahil reacts to rumour on Jayaprada slapping him)
समोर आलेल्या माहितीनुसार त्यावेळी अशी अफवा पसरली होती की, दलीप ताहिल हे जयाप्रदा यांच्याबरोबर एका चित्रपटात काम करत होते. त्या चित्रपटातील इंटिमेट सीनच्या शूटदरम्यान त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे जयाप्रदा संतापल्या आणि त्यांनी लगेच दलीप यांच्या कानशिलात लगावली होती. यावर एका मुलाखतीत प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण जयाप्रदा यांच्याबरोबर काम नाही केल्याचं सांगितलं. तसेच आपण जयप्रदासह कोणत्या चित्रपटात काम केलं होतं? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केला.
हे देखील वाचा – सेटवर लिपस्टिक चोरीचा आरोप करत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची काढली होती लायकी, म्हणालेली, “इतकं अपमानास्पद…”
दलीप ताहिल यांनी सिद्धार्थ कननला नुकतंच एक मुलाखत दिली. ज्यात त्यांनी जयाप्रदा यांच्याबरोबर घडलेल्या प्रकरणावर बोलताना म्हणाले होते की, “जेव्हा मी ही बातमी वाचली. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. कारण, जयाप्रदा या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे मी नेहमीच त्यांचा आदर करतो. पण मी त्यांच्याबरोबर कोणत्या चित्रपटात काम केलं आहे, हे मला माहित नाही. जर मला कोणी याबाबतीत सांगितलं, तर मला नक्की कळेल. पण मला आठवतंय की, मी त्यांच्याबरोबर एकही चित्रपटात एकत्र काम केलं नाही.” तसेच ते हेदेखील म्हणाले की, मला जयाप्रदा यांच्याप्रती विशेष आदर आहे. भले त्या चित्रपटाच्या सेटवर असो, किंवा त्यांच्या एकूण कारकीर्दीत. जयाप्रदा या नेहमीच महिलांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.”
हे देखील वाचा – Video : २०१४ मध्ये पहिलं लग्न, अनेक अभिनेत्यांबरोबर अफेअर अन्…; दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल पुन्हा अडकणार विवाहबंधनात, व्हिडीओ व्हायरल
दलीप ताहिल यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू यांसारख्या अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या कामाबद्दल बोलायला गेल्यास, त्यांनी ९०च्या दशकात ‘बाजीगर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘इश्क’, ‘रेस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी ‘मेड इन हेवन’, ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘तुलसीदास ज्युनिअर’ यांसारख्या अनेक वेबसीरिजमध्ये झळकले आहेत.