प्रसिद्ध बॉलिवूड गायक अतिफ अस्लमने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांतील गाण्याला आपला आवाज दिला आहे. त्याच्या आवाजाचे केवळ भारतात नव्हे, तर जगभरातही मोठी फॅन फॉलोविंग आहे. मात्र पाकिस्तानी कलाकारांवर असलेल्या निर्बंधामुळे त्याचे भारतात फारसे कॉन्सर्ट्स होत नाही. असं असलं तरी, तो त्याच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून नेहमीच त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. अशात अतिफचा लाईव्ह कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात घडलेल्या एका प्रकारामुळे काही काळ गायकाने आपलं गाणं थांबवलं. पण पुढे जी कृती त्याने केली, ते पाहून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. (Atif Aslam stop to his Concert due to fan throw Money)
अतिफ अस्लम सध्या त्याच्या कॉन्सर्टच्या निमित्ताने अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. त्यानिमित्ताने अमेरिकेत सुरु असलेल्या एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान गाणं गात होता. त्यावेळी एका चाहत्याने अतिफवर नोटांची उधळण केली, ज्यामुळे त्याने लगेच आपलं गाणं थांबवलं. आणि त्या चाहत्याला त्याच्यावर नोटांची उधळण थांबवण्याची विनंती केली. “मित्रा, तू माझ्यावर नोटांची उधळण करण्यापेक्षा हे पैसे दान कर”, असं म्हणत त्याने चाहत्याला बोलावून हे पैसे घेऊन जाण्याची विनंती केली.
हे देखील वाचा – चित्रीकरणादरम्यान जयाप्रदा यांनी दलीप ताहिल यांच्या मारली होती कानाखाली? बऱ्याच वर्षांनी अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाले, “मी त्यांच्याबरोबर…”
I love how he refuses to even touch the money #atifaslam pic.twitter.com/r0syjfrgQY
— Aish (@ashwrymthws) October 24, 2023
पुढे तो हेदेखील म्हणाला की, “मला माहित आहे की आपण खूप श्रीमंत आहात, मी तुमचा आदरदेखील करतो. पण पैश्यांची अशारीतीने उधळपट्टी करणे, हे अत्यंत चुकीचं आहे.” अखेर गायकाच्या भावनेचा आदर करत चाहत्याने त्वरित हे कृत्य थांबवलं आणि मंचावर येत ते पैसे गोळा केले. अतिफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.