भारतातील लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज वर्ल्डकपमधील हाय प्रेशर सामना खेळला जात आहे, तो सामना म्हणजे भारत – पाकिस्तान. या सामन्याची प्रेक्षकांमध्येच खूप आतुरता आहे. आजचा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार असून अगदी विस्फोटक सामना रंगणार यात काही शंका नाही. या खास क्षणी बॉलिवूडचे सितारे मॅचमध्ये रंगत लावायला हजर झाले आहेत.(India vs Pakistan viral memes)
मॅचच्या सुरुवातीला विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं. बॉलिवूडचा सुपरस्टार गायक अरिजीत सिंह लाईव्ह परफॉर्मसाठी पोहोचला होता. त्याचबरोबर शंकर महादेवन, सुखविंदर सिंहसह इतर सेलिब्रेटीही या मॅचला हजेरी लावली. नुकताच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, क्रिकेटर दिनेश कार्तिक व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विमानातील फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यामुळे भारतीय टिमच्या फॅन्ससह सेलिब्रिटींमध्येही बराच उत्साह पाहायला मिळत आहे.
IND Vs Pak match day pic.twitter.com/2mrk6PzguD
— harsh (@boygotsleep) October 14, 2023
इतर सामन्यांपेक्षा या सामन्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर सोशल मीडियावरही भारत-पाकिस्तानचे स्पेशल मीम्स बरेच व्हायरल होताना दिसतात. आताही विविध विषयाशी जोडलेले मीम्स सामन्याच्या अनुषंगाने व्हायरल होत आहेत. या सामन्याच्या अगोदरपासूनच भारत-पाकिस्तानाशी संबंधित मीम्सचं तुफान आलं आहे. सामन्याच्या दिवशी प्रत्येक भारतीय फॅनचा मूड मीम्समधील जेठालालसारखा असणार आहे.
Some scenes before ind vs pak match #worldcup #Worlds2023 #WorldCup2023 #indvspak2023 #INDvsPAK #ViratKohli???? #ViratKohli #RohitSharma #RohitSharma???? #babarazam #ShaheenShahAfridi #Rizwan #FunniestVideos #CricketWorldCup #Cricket #crickememes #Memes pic.twitter.com/BiYGeCZb3e
— Vikas (@VikasSo43929894) October 12, 2023
त्याचबरोबर एका मीम्समध्ये तर क्रिकेटर विराट कोहली व भारतीय क्रिकेट कॅप्टन रोहित शर्मा नाचताना दिसत आहेत तर त्यानंतर पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम डान्स करताना येतो. हे मिम्स तर बरंच व्हायरल होत आहे.
Leaked Highlights Of India vs Pakistan World Cup 2023 ????????????????#CWC2023 #CricketWorldCup2023#AnushkaSharma #ViratKohli#Abhiya #Abhisha #INDvAUS #ShaheenAfridi #ShaheenShahAfridi #Shubh #Memes #anshaafridi #AsianGames2023 #MohammedSiraj #ElvishArmy #ICCWorldCup2023 #AsianGames pic.twitter.com/dJTon0IvAx
— Memes21Center (@Memesparody21) September 20, 2023
बॉलिवूडमधील ‘जैनकुली की मैनकुली’ चित्रपटातील भारत-पाकिस्तान मॅचमधील क्षण बराच व्हायरल होत आहे. ज्यात असं लिहिलं गेलं की भारत-पाकिस्तान मॅचचे हायलाईट क्षण २०२३. या व्हिडिओत पाकिस्तानच्या बॉलरला भारताचा एक १६ वर्षीय खेळाडू ताबडतोड खेळताना दिसतो.
Salman Khan On Pak vs Ind match of 14th october ???? . #INDvPAK #IndiaVsPakistan #Tiger3 pic.twitter.com/DhZMwtHRtY
— Harry ???????? (@harrycricketpak) October 12, 2023
तर दुसऱ्या बाजूला भारत-पाकिस्तान मॅचबद्दल सलमान खान बोलताना दिसतो. या अगोदरचे ७ सामने भारताने जिंकले आहेत. आता पुढचा ८वा सामनाही भारत जिंकणार आहे याची वाट आम्ही सगळे बघतो आहोत, असा डायलॉगमध्ये बोलताना दिसत आहे.
वर्ल्डकप मॅच दरम्यान भारताचा आघाडीचा खेळाडू शुभमन गिल प्रकृती ठिक नसल्यामुळे रुग्णालयात होता. त्याबाबतचा रिल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात भारताचा कॅप्टन शुभमनला मॅच खेळायला बोलवतो. पण शुभमन नकार देतो. मग रोहित सांगतो की पाकिस्तानसह मॅच आहे आणि ते ही अहमदाबादमध्ये. हे ऐकल्यावर शुभमन सलाईंनची बॉटल घेऊन कसा चालत येईल याबाबतचं रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.भारत-पाकिस्तानची मॅचतर सगळ्यांच मनोरंजन करतच असते. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारे मिम्स या मॅचला आणखीनच रंगत लावत आहेत. सध्या हे मीम्स सोशल मीडियावर बरेच व्हायरल होता आहेत.