बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीनच वाढली आहेत. त्यात नुकतंच या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. यात रणबीर व रश्मिका हवेत रोमॅन्स करताना दिसत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. (Ranbir and rashmika romantic song from animal)
चित्रपटात रणबीर कपूरबरोबर रश्मिका प्रमुख भूमिकेत आहे. नुकतंच या दोघांच रोमँटिक ट्रॅक असलेलं ‘हुआ मैं’ गाणं प्रदर्शित झालं. ज्यात या दोघांची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून पहिल्यांदाच रणबीर व रश्मिकाची मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
गाण्याच्या सुरुवातीला रणबीर व रश्मिका त्यांचं कुटुंब त्यांच्या नात्यावरून चांगलंच ऐकवताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर गाण्याचा ट्रॅक सुरु होतो व त्याची सुरुवात कुटुंबासमोरच त्या दोघांच्या किसिंग सीनने होते. या गाण्यात दोघेही बरेच लिपलॉक किस करताना दिसले आहेत. पुढिल सीनसाठी ते दोघं स्पेशल विमानात दिसत आहेत. रणबीर टॉवेलवर दिसत आहे. दोघांच्या लग्नाचा सीनही यात दाखवण्यात आला आहे. पुढे केदारनाथ मंदिरासमोर दोघंही लग्न करताना दिसत आहेत. ज्यात त्या दोघांव्यतिरिक्त फक्त पंडित आहे. लग्नाचे फेरे त्यांनी हवनकुंडाऐवजी केदारनाथ मंदिरालाच घेतलेले पाहायला मिळत आहेत.
या चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटाची कथा एका त्रस्त बापाच्या व मुलाच्या नात्याभोवती फिरते. जी अंडरवर्ल्ड जगाच्या भूतकाळाशी जोडली गेली आहे. चित्रपटात एक मुलाचं वडिलांवर असलेलं जीवापाड प्रेम कथेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदिप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. चित्रपटात रणबीर कपूरसह अनिल कपूर, बॉबी देओल व रश्मिका मंदान्ना हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर तृप्ति डिमरी तसेच शक्ति कपूरही चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून हिंदीसह तामिल, तेलुगु, कन्नड व मल्ल्याळम भाषेत पाहायला मिळेल.