मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘नटरंग’, ‘टाईमपास’ किंवा ‘न्यूड’ असो यांसारखे विविध चित्रपट साकारत दिग्दर्शक रवी जाधव यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्यांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. त्यांचा दिग्दर्शक बनण्यापर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय होता. त्यामुळेच कदाचित त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना अगदी भावतात. त्यांची ‘ताली’ या बेवसिरिजने तर प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळवलं होतं. रवि नुकतेच ‘सारेगमप’ ‘लिटल चॅप्स’च्या मंचावर आले होते. या कार्यक्रमाचा मैत्री स्पेशल भागानिमित्त त्यांनी आपल्या कुटुंबाबाबत वक्तव्य केलं. (ravi jadhav share a memories about him family)
‘सारेगमप लिटल चॅप्स’ या कार्यक्रमात विविध पाहुणे मंडळी हजेरी लावतात. यावेळी विविध मंडळींनी हजेरी लावली त्याचबरोबर रवि जाधवही यावेळी उपस्थित होती. ‘मैत्री स्पेशल’ भागात त्यांच्या मित्राचा व्हिडिओ त्यांच्यासाठी भेट म्हणून दाखवण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मित्रासारख्या मोठ्या भावाबद्दल सांगितलं तसंच त्यांच्या कुटुंबाबाबतही वक्तव्य केलं.
रवि म्हणाले, “मी सिनेमात काम करतो. मला आता लोक ओळखतात. पण माझं घर अजून साधं आहे. माझा भाऊ अजूनही रिक्षा चालावतो. माझा भाऊ असा पहिल्यांदा टिव्हीवर आला असेल. माझा मधला भाऊ महेंद्र तो ही एका साध्या कंपनीत काम करतो. त्यामुळे घरी गेल्यावर कधी चित्रपट नसतो. मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या कुटुंबाला अजूनही मी नक्की काय करतो हे माहित नाही. त्यामुळे मी अजून तसाच आहे. मी अजून जराही बदललो नाही. जसा आधी होतो नटरंगच्याही आदी अजूनही तसाच आहे”.
रवि पुढे सांगतात, “माझा सर्वात मोठा भाऊ ज्याला मी असंख्य वेळा म्हटलं की अमुक गाडी घेतो तर जूनी गाडी तुला देऊ का? तु काही तरी नवीन चालू करशील. तर त्याचं म्हणण असं आहे की, सकाळी मुलांना रिक्षात सोडलं की मला दुपारी घरी येऊन छान झोप लागते. मी खूप आनंदी आहे. मला असं वाटतं की त्याला झोप लागते पण मला नाही. तो माझ्यापेक्षाही आनंदी आहे. तर मी त्या आनंदाच्या शोधात आहे”, असं सांगत रवि यांनी आपल्या कुटुंबातील साधेपणा अजूनही टिकून असल्याबाबत सांगितलं.