‘स्टार प्रवाह’ वाहिनी ही प्रेक्षकांची लाडकी वाहिनी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही वाहिनी अव्वल स्थानावर आहे. आशयघन कथानक असलेल्या या वाहिनीवरील साऱ्या मालिकांनी विशेष लोकप्रियता मिळवली आहे. अशातच या वाहिनीवर आणखी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलं आहे. कालपासून या नव्या मालिकेच्या प्रोमोने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून एक आगळा वेगळा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. (Isha Keskar And Akshar Kothari New Serial)
या नव्या मालिकेची जमेची बाजू म्हणजे मालिकेतील कलाकार. अद्याप मालिकेतील सर्वच कलाकारांची नाव समोर आलेली नाहीत. मात्र मालिकेत अभिनेता अक्षय कोठारी, अभिनेत्री किशोरी आंबिये, ईशा केसकर या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. मध्यमवर्गीय घराण्यातील तीन मुली, तर श्रीमंत घराण्यातील तीन मुलं या दोन्ही कुटुंबियांना एकत्र आणणारी ही कथा आहे, असं प्रोमोवरून कळून येत आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गणेशोत्सवात ईशा केसकर व अक्षर कोठारी सहभागी झाले होते. त्यांना एकत्र पाहून त्यांची नवी मालिका येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला होता. आता प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला आहे. ही मालिका २० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रात्री ९. ३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. चाहते देखील मालिकेवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्री किशोरी आंबिये ‘स्टार प्रवाह’च्या अनेक मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या. अश्यातच या नव्या मालिकेत त्या तीन मुलींची आई असल्याचं दाखवलं आहे. तर नुकतीच ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतून अक्षयने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यानंतर आता लगेचच तो ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत झळकणार आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेत आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.