रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बॉईज ४’चं लंडनमध्ये चित्रीकरण झालं पण निखिल बनेला नेलं नाही, अभिनेत्याची खंत, म्हणाला, “वाईट वाटतं पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 6, 2023 | 1:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
boys 4 marathi movie trailer

‘बॉईज ४’चं लंडनमध्ये चित्रीकरण झालं पण निखिल बनेला नेलं नाही, अभिनेत्याची खंत, म्हणाला, “वाईट वाटतं पण...”

मराठीमधील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘बॉईज’. या चित्रपटाच्या पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. बॉक्सऑफिसवरही चित्रपटांच्या तिन्ही भागांनी उत्तम कमाई केली. आता या चित्रपटाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बॉईज ४’ चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला सध्या प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

‘बॉईज ४’ हा निखिलचा पहिलाच मराठी चित्रपट. या चित्रपटासाठी तो बराच उत्सुक आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या प्रतिक्रिया पाहून निखिल भारावून गेला. ‘बॉईज ४’चं बरंच चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे. मात्र निखिल लंडनमध्ये चित्रीकरणासाठी नव्हता. याचं त्याला वाईट वाटतं. ‘बॉईज ४’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – “साडेतीन लिटर रक्ताच्या उलट्या झाल्या अन्…”, आदेश बांदेकरांनी सांगितलं त्यादिवशी नेमकं काय घडलं?, म्हणाले, “डोळे बंद झाले आणि…”

निखिलला चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने लंडनच्या चित्रीकरणाचा उल्लेख केला. तो म्हणाला, “मी लंडनला चित्रीकरणासाठी नव्हतो. पण याचं मला थोडं वाईट वाटलं. चित्रपटाची संपूर्ण टीम लंडनला गेली होती. लंडनला गेल्यानंतर संपूर्ण टीमला असं वाटत होतं की, बनेही आपल्याबरोबर पाहिजे होता. खूप मजा-मस्ती केली असती”.

आणखी वाचा – Video: प्रार्थना बेहरने सोडली मुंबई, ‘या’ ठिकाणी बांधलं आलिशान घर, तिथेच स्थायिक झाली अभिनेत्री, म्हणाली, “मुंबई सोडून…”

“गौरव मोरे सतत मला फोन करायचा. तू लंडनला यायला पाहिजे होतं मजा आली असती असं म्हणायचा. या चित्रपटामध्ये लंडनशी माझं थोडं फार कनेक्शन आहे. पण ते वेगळ्या माध्यमातून आहे. लंडनशी माझं कसं कनेक्शन आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच लक्षात येईल”. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटात ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे आदी कलाकार काम करताना दिसतील. २० ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

Tags: maharashtrachi hasy jatramarathi moviemarathi serialnikhil bane
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Rhea Chakraborty on Sushant Singh Rajput Death

सुशांत सिंग राजपूतवर काळी जादू करत होती रिया चक्रवर्ती? आत्महत्येच्या तीन वर्षानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी हडळ आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.