शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, वृद्ध जोडप्याचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 4, 2023 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Swades fame Actress Car Accident

'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात

अभिनेता शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात झाला. इटलीमध्ये हा अपघात झाला असून गायत्री व तिचा पती विकास ओबेरॉय हे सुखरूप आहे. मात्र, या अपघातात एका वृद्ध जोडप्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. (Swades fame Actress Car Accident)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायत्री व तिचा पती विकास ओबेरॉय इटलीतील सार्डिनिया येथील आलिशान कारच्या शर्यतीत सहभागी झाले होते. या दाम्पत्यांच्या लॅम्बोर्गिनी कारच्या मागे फेरारी व इतर अनेक आलिशान कार धावत होत्या. यावेळी एका कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक करताना अभिनेत्रीची कार पुढे असलेल्या फेरारीला धडकली. त्याचवेळेस पुढे असलेली फेरारी कार कॅम्पर व्हॅनला धडकली आणि ती व्हॅन उलटली. व्हॅन पलटी होताच फेरारीने पेट घेतला. या अपघातात त्या फेरारीमध्ये असलेल्या मेलिसा क्रौटली आणि मार्कस क्रौटली या स्वित्झर्लंडमधील वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा – रजनीकांतच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची एन्ट्री! तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा येणार एकत्र, पोस्टर प्रदर्शित

गायत्रीने फ्री प्रेस जरनलला दिलेल्या माहितीनुसार, ती व तिचा पती या अपघातात सुखरूप बचावले असून यात मृत्यू झालेल्या जोडप्याबद्दल तिने दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला. ज्यामध्ये या अपघाताची तीव्रता किती आहे, याचा आपल्याला अंदाज लावता येईल.

हे देखील वाचा – अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, वाचा कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?

Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T

— Globe Clips (@globeclip) October 3, 2023

अभिनेत्री गायत्री जोशीने २००० मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २००४ साली ‘स्‍वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिची गीता ही भूमिका प्रचंड गाजली असून या भूमिकेसाठी तिला पदार्पणाचे अनेक पुरस्कार मिळाले आहे. मात्र, या चित्रपटानंतर गायत्रीने बॉलीवूडला रामराम केला आणि उद्योगपती विकास ओबेरॉयसोबत विवाहबंधनात अडकली. या जोडीला दोन मुलं असून ती तिच्या ती तिच्या संसारात रमली आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री अनेकदा मुंबईत स्पॉट झाली असून गेल्यावर्षी ती तिच्या पतीसह हृतिक रोशनच्या गेट-टूगेदर पार्टीला दिसली होती.

Tags: bollywood newscar accidentgayatri joshiswadesSwades fame Actress Car Accident
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Rochelle Rao & Keith Sequeira blessed with Baby Girl

लग्नाच्या पाच वर्षांनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्री रोशेल राव झाली आई, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "हा प्रवास…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.