आशियायी चषक २०२३ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाने संपादित केलेला या ऐतिहासिक विजयाचं अगदी भरभरून कौतुक होत आहे. गेल्या बऱ्याच वर्षात भारताने असा विजय मिळवला नव्हता. त्यामुळे हा विजय भारतासाठी खूप विशेष ठरला आहे. या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला भारताला अवघ्या ५१ धावांचे आव्हाहन दिले होते. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ विकेट्स घेत श्रीलंकेच्या निम्म्या फलंदाजांना तंबूत परतवले. सिराजसह हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह या गोलंदाजांनीच गडी बाद करत इतर गोलंदाजांना संधीच दिली नाही. या तिघांनीच लंकेच्या सर्व फलंदाजांना अवघ्या ५० धावांत तंबूत परतवलं. त्यानंतर भारताकडून सुरुवातीला आलेल्या फलंदाजांनी म्हणजेच शुभमन गील व इशान किशन यांनी अवघ्या ६ षटकात ५१ धावांचं आव्हाहन पार करत हा सामना संपवला. (sidhharth jadhav post on india vs srilanka match final)
रविवारी खेळला गेलेला सामना आजवरचा ऐतिहासिक सामना ठरला. संपूर्ण भारतातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सोशल मीडियावर तर सगळीकडेच भारतीय संघाचे फोटो, व्हिडिओ दिसत होते. सिराज, गिल, इशान, रोहीत, पांड्या या सर्वांचे तोंड भरुन कौतुक केलं जात होतं. याच दरम्यान मराठमोळ्या कलाकाराने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली. तो मराठमोळा कलाकार म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव.

आशिया कपमध्ये भारतीय संघाने केलेल्या धडाकेबाज कामगिरीवर विशेषतः अंतिम सामन्यात त्यांनी साकारलेल्या विजयासाठी सिद्धार्थने केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने स्टोरीत लिहीलं की, ‘आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला शेजारी #indvssl #asiacup #final’, असं लिहीत त्याने वेगळ्या हास्यास्पद अंदाजात भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावर सध्या एका छोट्या कलाकाराचं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं तुफान गाजत आहे. त्याच गाण्याच्या ओळींचा संदर्भ घेत सिद्धार्थने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. सिद्धार्थसह अनेक मनोरंजन विश्वातील कलाकारांनी पोस्ट शेअर करत भारतीय संघाच्या विजयाचं अभिनंदन केलं आहे. काही दिवसात सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धा भारतातच होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून विश्वचषक मिळवण्याच्या दिशेने अपेक्षा वाढल्या आहेत.