शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हेअर कटिंग सलॉनमध्ये मसाजसाठी गेला संतोष जुवेकर, फोटो शेअर करत म्हणाला, “खोबरेल तेल जेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 18, 2023 | 10:47 am
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Santosh juvekar goes to street side salon

Santosh juvekar goes to street side salon

मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. ‘फक्त लढ म्हणा’, ‘रेगे’, ‘झेंडा’ यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय साकारत संतोषने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विविध मालिकांमधूनही विविध पात्र साकारत त्याने या क्षेत्रातही आपलं नाव कमावलं. मराठी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवल्यानंतर त्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातही नाव कमावलं. संतोष हिंदी सिनेमांसह वेब सीरीजमध्येही झळकला आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. रोजच्या आयुष्यातील कामाव्यतिरिक्त क्षण फोटो, व्हिडीओतून आपल्या चाहत्यापर्यंत पोहोचवत असतो. नुकतीच त्याने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. (Santosh juvekar goes to street side salon)

प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या ब्रँडच्या वस्तू वापरतो. वेगवेगळ्या ब्रँडकडून सुविधांचा लाभ घेत असतो. तसाच संतोषनेही आपण घेत असलेल्या एका एका ब्रँडचं विशेष कौतुक केलं आहे. फोटो शेअर करत त्याने एक भावनिक पोस्ट लिहीला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. संतोषने ‘मला नेहमी ब्रँन्डेड गोष्टी लागतात’, अस म्हणत एक फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

आणखी वाचा – महाविद्यालयात असतानाच विशाखा सुभेदारने ठरवली होती स्वतःच्या मुलांची नावं, म्हणाली, “वंशाचा दिवा पुढे…”

‘सर जो तेरा चकराय’ या जुन्या गाण्याची जोड देत फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तो एका रस्त्याच्या कडेला असलेल्या हेअर कटिंग सलॉनमध्ये बसलेला दिसत आहे. तिथल्या न्हाव्याकडून तो डोक्याची चंपी करुन घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने एक भलीमोठी पोस्ट लिहीली आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

आणखी वाचा – Video : परदेशात असलेला संकर्षण कऱ्हाडे बनवतोय जेवण, फोडणीचा भात बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

संतोष पोस्टमध्ये लिहीतो, ‘मला always ब्रँडेड गोष्टी लागतात. मी असा उगाच कुठेही कुठल्याही जागी जात नाही. जेव्हा मला माझ्यातला मी हवा असतो, तेव्हा ते फसफस करून उडवलेलं पाणी, फळीवरच्या लॉरीयलच्या बाटलीतलं खोबरेल तेल पचपच करून माझ्या डोक्यावर तो थापतो व खसाखसा घासतो. मग जेव्हा तो प्रेमाने विचारतो, ‘बरं वाटतंय का रे?’ तेव्हा अगदी घरी असल्यासारखं वाटतं. मला आईची आठवण येते. मला हा माझा brand  कायम सोबत हवा आहे. बस इतनासा ख्वाब है!!!’, असं लिहीत या सलॉनशी त्याचं असलेलं नातं सांगितलं आहे. त्यातील त्याचे भाव हे त्याला त्याच्या आईची आठवण करून देत असल्याचं तो म्हणतो आहे. संतोषच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही लाईकचा वर्षाव केला आहे.  

Tags: marathi actorpost viralsantosh juvekarsocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Tharal Tar Mag On Ganeshotsav

Video : बाप्पाच्या आगमनासाठी 'ठरलं तर मग'च्या संपूर्ण टीमची जोरदार तयारी, जुईने बनवले खास मोदक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.